मेलबर्न : विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेतील काही सामने झाल्यानंतर त्यांची रंगत वाढायला सुरुवात झाली आहे. कारण आत्तापर्यंत अनेक चुरशीचे सामने झाले आहे. आज दक्षिण आफ्रिका (SA) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही टीमला आजची मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलिया टीममधील माजी खेळाडू ब्रेट ली या एक भविष्यवाणी व्यक्त केली आहे. तसेच विश्वचषक स्पर्धेतील पाच जलदगती गोलंदाजांची निवड केली आहे.
ब्रेट लीने टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची तारिफ केली आहे. विशेष म्हणजे शमीची कामगिरी याच्यापुढे चांगली होईल असंही तो म्हटला आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत तो चांगली कामगिरी करेल असंही तो म्हणाला. त्याने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे.
शमी,शाहीन अफरीदी, ट्रेंट बोल्ट, मार्क वुड, पैट कमिंस हे पाच गोलंदाज विश्वचषक स्पर्धेत चांगली गोलंदाजी करण्याची शक्यता असल्याचं त्याने म्हटलं आहे.
ब्रेट लीने निवड केलेल्या प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीची तारिफ केली आहे.