T20 World Cup : ‘उमरान मलिकला आणा…’, मिशन T20 विश्वचषकासाठी भारतीय दिग्गजाची सुचना

| Updated on: Sep 30, 2022 | 2:44 PM

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुध्दा गोलंदाजांची जोरदार धुलाई झाली, त्यामुळे सोशल मीडियावर सुध्दा अधिक टीका झाली होती.

T20 World Cup : उमरान मलिकला आणा..., मिशन T20 विश्वचषकासाठी भारतीय दिग्गजाची सुचना
dilip vengsarkar
Image Credit source: twitter
Follow us on

टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंना दुखापतीने ग्रासलं आहे. त्यामुळे पुढील महिन्यात विश्वचषकात (T20 World Cup) टीम इंडियाची कामगिरी कशी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आशिया चषकात गोलंदाजांची धुलाई झाल्यानंतर खेळाडूंचं सिलेक्शन (Selection Team) करणाऱ्या टीमवरती जोरदार टीका झाली. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू घरी असल्याची आठवण सुद्धा रवी शास्त्रींनी करुन दिली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुध्दा गोलंदाजांची जोरदार धुलाई झाली, त्यामुळे सोशल मीडियावर सुध्दा अधिक टीका झाली होती. फलंदाजांनी अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे टीम इंडिया विजयी ठरली.

जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली, परंतु त्याला सुध्दा अपयश आले. दोन सामन्यात त्याच्या गोलंदाजीवरती सुद्धा अधिक धावा काढल्या गेल्या. बुमराहला दुखापत झाल्याने त्याने आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून त्याने माघार घेतली आहे. त्याच्या जाग्यावर मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाचा माजी गोलंदाज क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांनी उमरान मलिकला आणा असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. उमरान मलिक हा अधिक स्पीडने गोलंदाजी करीत असल्यामुळे त्याची गोलंदाजी ऑस्ट्रेलियातील मैदानावर अधिक चालू शकते असंही वेंगसरकर म्हणाले आहेत.