मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यानंतर त्यावर तात्काळ कारवाई होणार असं दिसतंय. कारण ज्यावेळी टीम इंडियातील खेळाडूंची विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. त्यावेळी टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी अनेक प्रश्व उपस्थित केले होते. कारण आशिया चषकापासून अनेक खेळाडूंनी खराब कामगिरी करुन सुद्धा त्यांना संधी देण्यात आली असं माजी खेळाडूंचं मत होतं. बीसीसीआयने हार्दीक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात न्यूझिलंड दौऱ्यासाठी युवा खेळाडूंची टीम पाठवली आहे.
काल बीसीसीआयने टीम इंडियाची निवड समिती बरखास्त करुन टाकली. त्यामुळे निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी आपली खुर्ची गमावली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांचं सुद्धा कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.
काल बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला. चार सदस्यांची निवड समिती बरखास्त करुन टाकली. त्यामध्ये चेतन शर्मा, हरविंदर सिंह, सुनील जोशी आणि देबाशीष मोहंती यांना हटवण्याचा निर्णय घेतला. सद्याच्या निवड समितीने दोनवेळा विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवलेल्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय तीन फॉरमॅटसाठी तीन कर्णधारांची निवड करण्याच्या विचारात आहे. त्याचबरोबर असंही होऊ शकतं की, रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि कसोटीचं कर्णधारपद ठेवलं जाऊ शकतं. टी20 सामन्यासाठी हार्दीक पांड्याला तयार केलं जाऊ शकतं. त्याची सुरुवात न्यूझिलंड दौऱ्यापासून झाली आहे.