दिल्ली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी पंचांचा एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टीम इंडिया अडचणीत असताना हा निर्णय दिल्याने नेटकऱ्यांनी पंच नितीन मेनन यांना धारेवर धरलं आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजी कुहनेमच्या गोलंदाजीवर विराट कोहलीला पायचीत दिलं. मात्र या निर्णयाविरोधात विराट कोहलीने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. मात्र त्यानाही आउट की नॉट आउट याबाबत कळलं नाही. त्यानंतर त्यांनी मैदानातील पंच नितिन मेनन यांच्यावर निर्णय सोडला. त्यांनीही आपला निर्णय कायम ठेवत विराटला तंबूचा रस्ता दाखवला.पण तुम्हाला माहिती आहे का? पंच नितीन मेनन यांची क्रिकेट कारकिर्द अवघ्या 24 तासात संपली होती.
नितीन मेनन 39 वर्षांचे असून त्यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1983 ला मध्य प्रदेशच्या इंदौर शहरात झाला. नितीन मध्य प्रदेशकडून लिस्ट ए सामने खेळला आहे.नितीन मेनन संघासाठी विकेटकीपिंग आणि राइटी बॅटिंग करायचे. पण नितीन मेनन यांची कारकीर्द अवघ्या 24 तासांत संपली. नितीन मेननने 8 जानेवारी 2004 रोजी विदर्भाविरुद्ध पदार्पण केले आणि शेवटचा सामना 9 जानेवारी 2004 रोजी उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला.नितीन मेननची कारकीर्द अवघ्या 2 सामन्यात संपुष्टात आली. त्याने एक डाव खेळला आणि फक्त 7 धावा करता आल्या. मेननने 17 चेंडू खेळले आणि त्याचा स्ट्राईक रेट 41.17 होता.
नितीन मेनन यांनी क्रिकेटला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वडील नरेंद्र मेनन यांच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला. त्याचे वडील पंच होते. नितीन मेननने 2015-16 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पंच म्हणून कामगिरी बजावली. नितीन मेनन यांनी 26 जानेवारी 2017 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचाची भूमिका बजावली. 15 मार्च 2017 रोजी, मेनन यांनी आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यात पंच होते. त्यानंतर 2019 मध्ये अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्यांनी प्रथमच अंपायरिंग केले.नितीन मेनन यांनी आतापर्यंत 19 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 61 टी-20 सामन्यांमध्ये अंपायरिंग केले आहे.
कुहनेमन याने टाकलेल्या बॉलवर एलबीडब्ल्यूचा निर्णय फार क्लोज होता. बॉल आधी विराटच्या बॅटला लागला की पॅडला, हे स्पष्ट दिसलं नाही पण फिल्ड अंपायरने त्याला आऊट घोषित केलं. विराटने अपांयरच्या या निर्णयाला आव्हान देत डीआरएस घेतला. आता विषय थर्ड अपांयराच्या कोर्टात गेला. थर्ड अंपायरने उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांचा वापर केला. मात्र थर्ड अंपायरला स्पष्टपणे कळू शकलं नाही. विराट आऊट असल्याचा पुरावा थर्ड अंपायरकडे पण नव्हता. थर्ड अंपायर यालाही समजू शकलं नाही की बॉल आधी पॅडला लागलाय की बॅटला. परिणामी फिल्ड अंपायर याने दिलेला सॉफ्ट निर्णय ग्राह्य धरुन विराटला आऊट जाहीर करण्यात आलं.