पुढच्या महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाच्या (Team India) ऑस्ट्रेलियाबरोबर (Australia) होणाऱ्या मॅच अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी दावेदार मानला जात आहे. ऑस्ट्रे्लिया विरुद्ध भारताचे T20 चे तीन सामने होणार आहेत. त्यापैकी पहिला भारताचा सामना मोहोलीमध्ये (Mohali) होणार आहे. आशिया चषकात टीम इंडियाची चांगली कामगिरी न झाल्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागलं होतं.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाला विजय अपेक्षित आहे. कारण त्या विजयामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात भारतीय संघ एक आत्मविश्वासाने खेळेल.
मागच्या काही दिवसांपासून टीम इंडियाची ओपनिंग जोडी कोण असणार अशी चर्चा आहे. परंतु केएल राहूल आणि रोहित शर्मा ओपनिंग जोडी असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच विराट कोहली नंबर 3 ला येईल. त्यानंतर सुर्यकुमार यादव असेल.
दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे सुद्धा पाहावे लागणार आहे. कारण आशिया चषकामध्ये दिनेश कार्तिकला कमी संधी देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी टीका केली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अधिक ऑलराऊडर खेळवण्याचा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची खेळी आहे. त्यामुळे टीम इंडीयाला अधिक फायदा होऊ शकतो.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह