मुंबई : चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिल्ली कॅपिट्ल्सला (Delhi Capitals) विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 188 धावा केल्या. चेन्नईकडून ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाने (Suresh Raina) या 14 व्या मोसमाची अर्धशतकाने शानदार सुरुवात केली. रैनाने या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावलं. रैनाच्या या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईला 188 धावांपर्यंत मजल मारता आली. (chennai super kings vs delhi capitals ipl 2021 mister ipl suresh raina scored 54 runs against delhi capitals)
Raina is back with a bang! ??
Brings up his FIFTY off 32 deliveries.
Live – https://t.co/JzEquks8qB #CSKvDC #VIVOIPL pic.twitter.com/eTbUWQnays
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2021
रैनाने सिक्स खेचत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या 32 चेंडूत हे अर्धशतक झळकावलं. रैना मैदानात चांगला सेट झाला होता. पण निर्णायक क्षणी रैना दुर्देवी ठरला. रैना रन आऊट झाला. रैनाने एकूण 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 4 षटकार लगावले.
रैनानंतर सॅम करनने रवींद्र जाडेजाच्या मदतीने दिल्लीवर हल्लाबोल केला. सॅमने 15 चेंडूत 4 फोर आणि 2 सिक्ससह 34 धावांवर आऊट झाला.
युवा फलंदाज रिषभ पंतचा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना आहे. या पहिल्याच सामन्यात रिषभची गाठ त्याचा गुरु महेंद्रसिंह धोनीसोबत आहे. त्यामुळे पंत कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
दिल्लीने 2 खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्कियाची उणीव भरुन काढण्यासाठी इंग्लंडच्या ख्रिस वोक्स आणि टॉम करन या अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फॅफ डु प्लेसीस, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करन आणि मोईन अली.
शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (कर्णधार), अमित मिश्रा, आवेश खान, मार्कस स्टोइनिस, शिमरन हेटमायर, ख्रिस वोक्स, रवीचंद्रन अश्विन आणि टॉम करन.
संबंधित बातम्या :
CSK vs DC Live Score, IPL 2021 | दिल्लीची झोकात सुरुवात, शॉ-धवनची फटकेबाजी
(chennai super kings vs delhi capitals ipl 2021 mister ipl suresh raina scored 54 runs against delhi capitals)