मुंबई : भारतीय कसोटी संघाची भिंत म्हटला जाणारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) गेल्या काही काळापासून इंग्लंडमध्ये (England) आपल्या तुफान फलंदाजी चर्चेत आहे. कौंटी क्रिकेटमध्ये धावा केल्यानंतर आता रॉयल लंडन वन-डे चषकातही (Royal London One-Day Cup 2022) पुजाराच्या बॅटने चांगल्या गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. शुक्रवारी वॉर्विकशायर विरुद्धच्या सामन्यात पुजाराने 73 चेंडूत शतक झळकावले. तर एका षटकात 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने एकूण 22 धावा केल्या. पण, या चमकदार कामगिरीनंतरही त्यांच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. रॉयल लंडन वन डे कपमध्ये चेतेश्वर पुजारा हा संघाचा यशस्वी कर्णधार आहे.
4 2 4 2 6 4
हे सुद्धा वाचाTWENTY-TWO off the 47th over from @cheteshwar1. ? pic.twitter.com/jbBOKpgiTI
— Sussex Cricket (@SussexCCC) August 12, 2022
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना वॉर्विकशायर संघाने सलामीवीर रॉब येट्सच्या शतकाच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 310 धावा केल्या. रॉबने 111 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 114 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याच्याशिवाय वॉर्विकशायरचा कर्णधार विल रोड्सने 76 आणि मायकेल बर्गेसने 58 धावा केल्या. 311 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ससेक्स संघाची सुरुवात चांगली झाली. हॅरिसन वॉर्डच्या (22) रूपाने संघाला 35 धावांवर पहिला धक्का बसला, तर दुसरी विकेट 112 धावांवर पडली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने कर्णधारपदाची खेळी खेळताना संघाची धुरा तर सांभाळलीच, शिवाय कठीण परिस्थितीतही शतक झळकावले.
44 व्या षटकापर्यंत पुजारा अतिशय सुचक इशाऱ्या नुसार फलंदाजी करत होता. तेव्हा तो त्याच्या 59 चेंडूत 66 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर मैदानावर उपस्थित होता. तेव्हा त्याच्या संघाला शेवटच्या 6 षटकात 70 धावा हव्या होत्या. त्यानंतर पुजाराने 45 व्या षटकात नॉर्वेलचा सामना केला. या षटकात 22 धावा केल्या. पुजाराने ओव्हरचा एकही चेंडू डॉट केला नाही आणि 4,2,4,2,6 आणि 4 च्या मदतीने मोठी धावसंख्या उभारली.
45 व्या षटकात 22 धावा झाल्यानंतर पुजाराच्या संघाला 30 चेंडूत 48 धावा हव्या होत्या. पुजाराने 73 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, परंतु संघाला शेवटच्या 12 चेंडूत 20 धावांची गरज असताना 49 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला. पुजारा बाद झाल्यानंतर संघाला सावरता आले नाही आणि ससेक्सला 4 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. पुजाराने 79 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 107 धावांची शानदार खेळी केली.