नवी दिल्ली : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात 3 विकेट्सने (Aus vs Ind 4th Test) शानदार विजय मिळवून. बॉर्डर-गावसकर मालिका 2-1 ने नावावर केली. (Border Gavaskar Trophy) टीम इंडियाने हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) कुशल नेतृत्वात ही मालिका जिंकली. ही मालिका जिंकण्यात भारताची अभेद्य भिंत चेतेश्वर पुजाराचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. साहजिकच चेतेश्वर पुजाराचे वडील अरविंद पुजारा यांना लेकाच्या खेळीचा अभिमान वाटतोय. त्यांनी पोराच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय. एनडीटीव्हीशी त्यांनी खास बातचित केली. (Cheteshwar pujara is The Backbone of india test team Says Pujara Father Arvind pujara)
“चेतेश्वरची म्हणजे माझ्या लेकाची खेळी मी कधीही विसरणार नाही एवढी अविस्मरणीय इनिंग त्याने खेळली आहे. त्याने त्याच्या खेळीने करोडो भारतवासियांचं आणि साहजिकच माझं हृदय जिंकलं. त्याच्या खेळीने मी खूप आनंदी आहे. मॅचमध्ये एक वेळ अशी आली होती की, त्याला झालेल्या जखमांमुळे तो खेळू शकणार नाही, असं वाटलं. पण चेतेश्वरने जिद्द सोडली नाही. त्याने मैदानावर तळ ठोकून कांगारुंच्या गोलंदाजांना जेरीस आणलं”, असा कौतुकाचा वर्षाव अरविंद पुजारा यांनी केला.
बॅटिंग करताना चेतेश्वरच्या अंगठ्याला दुखापत झाली तसंच अनेक वेळा त्याच्या हेल्मेटला चेंडू लागले. त्यावेळी आम्हाला चिंता वाटत होती. परंतु त्याने त्याची बॅटिंग न थांबवता तसंच जिद्द न सोडता भारताच्या विजयासाठी तो खेळपट्टीवर तळ ठोकून राहिला. चेतेश्वर पुजारा म्हणजे भारतीय कसोटी संघाच्या पाठीचा कणा आहे, असंही अरविंद पुजारा म्हणाले.
चेतेश्वर पुजारा यानं ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करत 56 धावा केल्या. चेतश्वर पुजारानं 211 चेंडूंचा सामना करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही. त्याच्या याच खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघाचं मनोधैर्य तुटलं. पुढे रिषभ पंतने तर कांगारुंचे मनसुबे उधळून भारताच्या विजयाचा गुलाल उधळला.
हाताला बसलेल्या फटक्यानंतर पुजाराने जोमाने खेळायला सुरुवात केली. मात्र पुन्हा डावाच्या 51 व्या ओव्हरमध्ये आणखी एक प्रकार घडला. यावेळेसही हेझलवूड गोलंदाजी करत होता. हेझलवूडने शॉर्ट पिच बॉल टाकला. हा बॉल पुजाराच्या हेल्मेटवर येऊन आदळला. हा शॉर्ट पीच चेंडू इतक्या वेगाने आला की पुजाराचं हेल्मेट फुटलं. त्याचे दोन तुकडे झाले.
चौथ्या कसोटीत भारतीय संघाच्या विजयामध्ये शुभमन गिल आणि रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी केलेली कामगिरी महत्वाची ठरली. भारताच्या विजयाचा पाया शुभमन गिलनं रचला. सकाळी सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर गिलने चेतेश्वर पुजाराच्या साथीने डाव सावरला. शुभमन गिलंने सामन्याच्या पहिल्या डावात 50 धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या डावात त्याने 91 धावा चोपल्या. चेतेश्वर पुजारा यानं ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करत 56 धावा केल्या. चेतश्वर पुजारानं 211 चेंडूंचा सामना करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही.
(Cheteshwar pujara is The Backbone of india test team Says Pujara Father Arvind pujara)
हे ही वाचा :
सिराज-शार्दुलचा भेदक मारा, पंतचा तडाखा आणि पुजाराची झुंज; भारताच्या विजयाची 5 कारणं