मुंबई : कसोटी कारकिर्दीत चेतेश्वर पुजाराच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. चेतेश्वर पुजाराने हा विक्रम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात नोंदवला आहे. चेतेश्वर पुजाराने सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि द्रविड यांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा 121 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. यात 3 चौकारांचा समोवश होता. पुजाराने या डावात 9 धावा करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 धावा पूर्ण केल्या आहे. अशी कामगिरी करणारा भारताचा चौथा खेळाडू आहे.
चेतेश्वर पुजाराने 24 सामने आणि 43 डावात ही कामगिरी केली आहे. या दरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 शतकं आणि 11 अर्धशतकं ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची फलंदाजी सरासरी 50 हून अधिक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 धावांचा टप्पा सचिनने 42, लक्ष्मणने 41, पुजाराने 43 आणइ राहुल द्रविडने 53 डावात गाठला आहे.
Milestone Alert ?@cheteshwar1 completes 2⃣0⃣0⃣0⃣ Test runs against Australia ??
Follow the match ▶️ https://t.co/8DPghkx0DE#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/c0YZL3j0yj
— BCCI (@BCCI) March 11, 2023
सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा केल्या आहेत. सचिनने 39 सामन्यातील 74 डावात 55 च्या रनरेटने 3,690 धावा केल्या आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मणने 29 कसोटी सामन्यात 54 डावात 49.67 च्या रनरेटने 2,434 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडने 32 कसोटी सामन्यातील 60 डावात 2143 धावा केल्या आहेत.
भारताच्या चार खेळाडूंनी अशी कामगिरी केली असली तर ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंना हा टप्पा गाठता आला आहे. रिकि पाँटिंग आणि मायकल क्लार्क यांनी दोन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. रिकी पाँटिंगने 54.36 च्या सरासरीने 2555 धावा केल्या आहेत. तर मायकल क्लार्कने 53.92 च्या सरासरीने 2,049 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने पहिल्या गड्यासाठी दोघांनी 74 धावांची भागीदारी केली. मात्र रोहित शर्मा मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. मॅथ्यु कुन्हेमनच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारल्याने रोहित शर्मा बाद झाला. त्याने 58 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. त्यानंतर पुजारा आणि गिल जोडीने मैदानात चांगलाच जम बसवला. दुसऱ्या गड्यासाठी दोघांनी 100 हून अधिक धावांची भागीदारी केली. गिलनं 194 चेंडूत 101 धावा करत शतक झळकावलं. त्यानंतर पुजारा 42 धावा करून तंबूत परतला.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.