मुंबई : टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलियाला (Australia) चौथ्या कसोटी सामन्यात धूळ चारली आहे. टीम इंडियानं ब्रिस्बेन कसोटीत (Aus vs Ind 4th Test) विजय मिळवत इतिहास रचला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकाही (Border Gavaskar Trophy) जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर सर्व क्षेत्रातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (CM Uddhav Thackeray Comment on Team India success in australia)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. “अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील,” असे ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.
“टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर देखील टीम इंडियाने आशावाद आणि जिद्द यांच्या जोरावर संपूर्ण कसोटी मालिका जिंकली. धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय संघानं या मालिकेत नवीन विक्रम केले. ही देशातील सर्व क्रिकेटप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Congratulations Team India for this historic win! ?? https://t.co/P6M9HlHIfq
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 19, 2021
आदित्य ठाकरेंकडूनही शुभेच्छा
तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही टीम इंडियाच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहे. “सर्व भारतीयांसाठी आनंद आणि अभिमानाचा क्षण! धन्यवाद टीम इंडिया!” असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले.
The Moment of joy and pride! Thank you Team India! https://t.co/DtnLsyE4Ki
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 19, 2021
(CM Uddhav Thackeray Comment on Team India success in australia)
आस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 328 धावांच आव्हान ठेवलं होते. भारतानं हे आव्हान शुभमन गिलच्या 91 आणि रिषभ पंतच्या 89 धावा आणि चेतेश्वर पुजाराच्या 56 धावांच्या जोरावर पूर्ण केले. दुसऱ्या डावात शुभमन गिलंनं 91 धावा केल्या. कॅप्टन अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या रिषभ पंतनं आक्रमक फलंदाजी करत 138 चेंडूमध्ये 9 चौकार, एक षटकारासह 89 धावांची विजयी खेळी केली. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी यांच्या साथीनं मैदानावर तळ ठोकून उभं राहत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताच्या विजयाचा पाया शुभमन गिलनं रचला तर विकेटकिपर रिषभ पंतनं विजयाचा कळस रचला आहे. शुभमन गिलंन 91 धावा केल्या तर रिषभ पंतनं 89 धावा करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. चौथ्या कसोटी सामन्यासह टीम इंडियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर कब्जा कायम ठेवला आहे. भारताचा प्रमुख कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यानं ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करत 56 धावा केल्या. चेतश्वर पुजारानं 211 चेंडूंचा सामना करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही.
कसोटी सामना जिंकण्यासाठी गोलंदांजांना 20 विकेट घ्याव्या लागतात, असं म्हटलं जातं. टीम इंडियाच्या नवख्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 369 धावांवर रोखल. पहिल्या डावात शार्दूल ठाकूर, टी,नटराजन, वॉशिंग्टन सुंदर यांनी 3 गडी बाद केले तर मोहम्मद सिराजनं 1 एक विकेट घेतली. पहिल्या डावात केवळ एक विकेट घेतलेल्या मोहम्मद सिराजनं ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 5 विकेटस घेतल्या. मराठमोळ्या शार्दूल ठाकूरनं देखील ऑस्ट्रेलिाच्या 4 विकेट घेतल्या तर वॉशिग्टन सुंदरनं एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 294 धावांवर रोखण्यात गोलंदाजांची देखील महत्वाची भूमिका होती. (CM Uddhav Thackeray Comment on Team India success in australia)
संबंधित बातम्या :
Border Gavskar Trophy | टीम इंडियाची हॅटट्रिक, सलग तिसरा बॉर्डर गावसकर मालिका विजय
Ind Vs Aus | कांगारुंना लोळवल्यानंतर देशभरात जल्लोष, पंतप्रधान नरेंद्र मोदीही म्हणाले….