मेलबर्न : टीम इंडियाची विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) आतापर्यंत चांगली कामगिरी राहिलेली आहे. टीम इंडियाचे चार फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने प्रत्येक मॅचमध्ये टीम इंडियाची धावसंख्या अधिक असते. त्यामध्ये केएल राहूल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव (Surykumar Yadav), हार्दीक पांड्या (Hardik Padhya)या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. सुर्यकुमार यादव आशिया चषकापासून अधिक चांगली खेळी करतोय, त्यामुळे त्याचा चाहतावर्ग अधिक वाढला आहे. तसेच टीम इंडियाचे प्रशिक्षक राहूल द्रविड (Rahul Dravid) याने सुद्धा कौतुक केलं आहे.
.@imVkohli approves ? ?#TeamIndia | @surya_14kumar | #T20WorldCup | #INDvZIM pic.twitter.com/2aFdGaqct7
हे सुद्धा वाचा— BCCI (@BCCI) November 6, 2022
काल झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. त्यानंतर रविचंद्रन आश्विन आणि राहूल द्रविड यांनी सुर्यकुमार यादवच्या फलंदाजीचं कौतुक केलं. कालच्या मॅचमध्ये सुर्यकुमार यादवने 25 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 186 झाली होती.
“ज्यावेळी सुर्यकुमार यादव मैदानावर असतो. त्यावेळी तो आता सगळ्यांचं मनोरंजन करायला उतरला आहे. तसेच त्याला क्रिकेट खेळताना पाहून आम्हाला खूप आनंद होतो” असं राहूल द्रविडने सांगितलं.
“सतत अशा पद्धतीने खेळत राहणं शक्य नाही. परंतु सुर्यकुमारची सध्याची फलंदाजी पाहून मला खूप आनंद होतो. मागच्या दोन वर्षात त्याने मैदानाचा आणि मैदानाबाहेरचा अधिक अभ्यास केला आहे” असंही द्रविड म्हणाला.