धोनी (Dhoni)आणि गौतम गंभीरमध्ये (Gambhir) मागच्या काही दिवसांपासून शीतयुद्ध असल्याचं पाहायला मिळत आहे. गौतम गंभीरने अनेकदा धोनीवरती टीका केली आहे. त्यामुळे एखादी गोष्ट घडल्यानंतर दोघेही एकमेकांवर टीका करीत असतात. आयपीएलच्या (IPL) मैदानात सुद्धा हा संघर्ष पाहायला मिळाला आहे. आयपीएल खेळत असताना ज्यावेळी या दोघांची मॅच असते. त्यावेळी दोघांचा संघर्ष पाहायला मिळतो.
महेंद्रसिंग धोनीने नुकतंच एक बिस्कीट लॉंन्च केलं, त्यावेळी त्याने ज्यावेळी आम्ही 2011 साली विश्वचषक जिंकलो होतो. त्यावेळी सुद्धा आम्ही या बिस्कीटाचं लॉंन्चींग केलं होतं. त्यामुळे यावर्षी सुद्धा चषक जिंकण्याची आम्हाला आशा आहे.
धोनीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धोनी पैशासाठी काहीही करीत असल्याची टीका त्याच्यावर चाहत्यांनी केली आहे.
त्यानंतर गौतम गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो त्याच्या कुत्र्याला ओरिओ नावाने हाक मारीत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गंभीरने धोनीला उत्तर दिल्याची चर्चा आहे.
2011 चा विश्वचषक धोनीमुळे जिंकला यामुळे मागच्या खूप दिवसांपासून महेंद्रसिंग धोनी आणि गंभीर यांच्यात वाद आहे. गंभीर म्हणतोय प्रत्येक खेळाडूच्या योगदानामुळे टीम इंडियाने विश्वचषक जिंकला आहे.