नवी दिल्ली : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022)चा काल दुसरा दिवस पूर्ण झाला आहे. भारतानेही आपलं खातं उघडलं आहे. शनिवारी 30 जुलैला खेळांच्या दुसऱ्या दिवशी भारतानं वेटलिफ्टिंगच्या मदतीने सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकलं. अशा प्रकारे भारतीय संघानं पदकतालिकेतही (Commonwealth Games 2022 Medal Tally) प्रवेश केला. त्याचबरोबर अपेक्षेनुसार ऑस्ट्रेलियानं पहिलं स्थान कायम राखलं आहे. जलतरणाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने एकूण 13 सुवर्णपदकांसह अव्वल स्थानावर चांगली आघाडी मिळवली आहे. शनिवारी भारताने (India) वेटलिफ्टिंगच्या (Weightlifting) चारही स्पर्धांमध्ये पदकांसह पदार्पण केले. भारताने आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदके जिंकली आहेत. अशाप्रकारे भारताने टॉप 10 मध्ये आपले स्थान निश्चित केले असून सध्या ते आठव्या स्थानावर आहे. स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने 49 किलो गटात भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले.
ऑस्ट्रेलिया 13 सुवर्णांसह एकूण 32 पदकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. सुवर्ण आणि एकूण पदकांमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या यशाचे एक मोठे कारण नेहमीप्रमाणे जलतरण आहे. ज्यामध्ये त्यांना 8 सुवर्णांसह एकूण 22 पदके मिळाली आहेत. न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर असून यजमान इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत एकूण 115 पदकांचे वितरण करण्यात आले असून त्यात 22 देशांनी आपले खाते उघडले आहे. या 115 पदकांपैकी 39 सुवर्ण, 39 रौप्य आणि 37 कांस्य पदके जिंकली आहेत.
A lil treat for Aussies as they wake up this morning?? @CommGamesAUS
Here’s how the Medal Table is looking at the end of Day 2???
See you tomorrow for more Commonwealth Games action✌️@thecgf pic.twitter.com/xpr03mdcW4
— Birmingham 2022 (@birminghamcg22) July 30, 2022
संकेत सरगरने भारतासाठी पहिले पदक जिंकले. 21 वर्षीय वेटलिफ्टरने 55 किलो गटात रौप्य पदक जिंकले. यानंतर गुरुराजा पुजारीने पुरुषांमध्ये 61 किलो गटात कांस्यपदक जिंकले. मीराबाई चानूला तिसरे पदक आणि सर्वात मोठे यश मिळाले. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाईने सलग दुसऱ्या खेळात सुवर्ण आणि सलग तिसरे पदक जिंकून तिची यशोगाथा सुरू ठेवली. त्यानंतर दिवसाच्या शेवटच्या स्पर्धेत बिंदियारानीने महिलांच्या 55 किलोमध्ये 202 किलो वजनासह रौप्यपदक जिंकले आणि भारतासाठी दिवसाचा शेवट चांगला केला.
बिंदियानं या फेरीत खरं आश्चर्य दाखवलं. या फेरीत तिनं कोणत्याही वेटलिफ्टरपेक्षा जास्त वजन उचललं. बिंदियानं 110 किलो वजन उचलून यशस्वी सुरुवात केली परंतु दुसऱ्या प्रयत्नात 114 किलो वजन उचलण्यात ती अपयशी ठरली. मात्र, असं असूनही तिनं हार मानली नाही. यावेळी ती तिसऱ्या स्थानावर होती. पहिल्या स्थानावर येण्यासाठी त्याला 8 किलो वजन उचलावे लागलं. तर दुसऱ्या स्थानावर येण्यासाठी तिला 3 किलो वजन उचलावं लागलं.