नवी दिल्ली : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा (Commonwealth Games 2022) तिसरा दिवस देखील पूर्ण झाला आहे. पुन्हा एकदा पदक टेबलबद्दल (Commonwealth Games 2022 Medal Tally) जाणून घेण्याची वेळ आली आहे. प्रत्येक अंदाज आणि अपेक्षेनुसार, ऑस्ट्रेलियानं (Australia) त्यांच्या स्टार जलतरणपटूंच्या बळावर तिसऱ्या दिवशी वर्चस्व राखले आणि पदकतालिकेत पहिल्या स्थानावर आपली पकड मजबूत केली. त्याच वेळी, भारताच्या वेटलिफ्टर्सनं केवळ विक्रमी वजनच उचलले नाही, तर पदक जिंकण्याच्या आशांचे वजनही यशस्वीपणे पार पाडले आणि पदकतालिकेत सहाव्या क्रमांकावर पोहोचले. रविवारी 31 जुलैला खेळाचा तिसरा दिवस भारतासाठी फारशी पदके घेऊन आला नाही. पण, जी पदके आली ती सर्वात चमकदार होती. रविवारीही भारतासाठी दोन युवा वेटलिफ्टर्सनी पदार्पणाच्या सामन्यात सुवर्ण यश मिळविले. 19 वर्षीय जेरेमी लालरिनुंगा यानं सुरुवात केली. पुरुषांच्या 65 किलोमध्ये जेरेमीने दिवसाचं पहिलं सुवर्ण आणि भारतासाठी खेळातील दुसरं सुवर्ण जिंकलं. त्यानंतर दिवसाच्या शेवटच्या स्पर्धेत 20 वर्षीय अचिंत शुलीने दिवसातील दुसरं सुवर्ण आणि पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात एकूण तिसरं सुवर्ण जिंकले.
जेरेमी आणि अचिंत यांच्या या दमदार कामगिरीने भारताला शनिवारच्या तुलनेत पदकतालिकेत दोन स्थानांवर नेले. भारताकडे आता 3 सुवर्णांसह 6 पदके आहेत आणि त्यामुळे भारताला सहावे स्थान मिळाले आहे. भारताची सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत, ज्यामध्ये 3 सुवर्ण व्यतिरिक्त 2 रौप्य आणि 1 कांस्य आहे. भारताने वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक 6 पदके जिंकली आहेत. वेटलिफ्टिंगमधील एक स्पर्धा वगळता भारताला आतापर्यंत सर्व पदके मिळाली आहेत. पोपी हजारिका महिलांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.
How the tables have turned?!?
Welcome @WeAreTeamIndia to the top 6, as they won their second and third Gold on Day 3.
Roll on Day 4?
Catch up with day’s action at?https://t.co/8u2EKSwAjk #CommonwealthGames22 #B2022 pic.twitter.com/AdhaJcjxYt
— Birmingham 2022 (@birminghamcg22) July 31, 2022
पाकिस्तानची कॅप्टन बिस्माह मारुफने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावू दिले नाही. पावसामुळे हा सामना 20 ऐवजी 18 षटकांचा करण्यात आला होता. पाकिस्तानची टीम निर्धारित 18 ओव्हर्स मध्ये 99 धावांवर ऑलआऊट झाली. पाकिस्तानकडून फक्त सलामीवीर मुनीबा अलीने 30 चेंडूत सर्वाधिक 32 धावा केल्या. कॅप्टन बिस्माह मारुफने (17) धावा केल्या. पाकिस्तानचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. इरम जावेदच्या रुपाने शुन्यावर पाकिस्तानची पहिली विकेट गेली. त्यानंतर मुनीबा आणि मारुफने डाव सावरला. दोघींनी 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर भारताची गोलंदाज स्नेह राणाने मारुफने 17 धावांवर पायचीत पकडलं. त्यानंतर पाकिस्तानच्या डावाची घसरण सुरु झाली. पाकिस्तानचा डाव 99 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणा, राधा यादवन प्रत्येकी दोन, तर रेणुका सिंह, मेघना सिंह आणि शेफाली वर्माने प्रत्येकी एक विकेट घेतला.