CWG 2022, CWG 2022 Cycling : राष्ट्रकुल स्पर्धेत भयानक घटना, रायडर्सची एकमेकांना धडक, भारतीय खेळाडू थोडक्यात बचावला, पाहा VIDEO

| Updated on: Aug 01, 2022 | 9:53 AM

रविवारी दुपारी पुरुषांची 15 किमी स्क्रॅच शर्यत सुरू असताना हा अपघात झाला. शर्यतीचा दहावा लॅप सुरू असताना सायकलस्वार एकमेकांवर आदळले. लंडनमधील ली व्हॅली वेलो पार्कमध्ये ही घटना घडलीय.

CWG 2022, CWG 2022 Cycling : राष्ट्रकुल स्पर्धेत भयानक घटना, रायडर्सची एकमेकांना धडक, भारतीय खेळाडू थोडक्यात बचावला, पाहा VIDEO
राष्ट्रकुल स्पर्धेत भयानक घटना
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022)  रविवारचा दिवस भारतासाठी (India) चांगला ठरला . भारताच्या झोळीत दोन सुवर्णपदके आली. एकीकडे भारतीय खेळाडू आनंदोत्सव साजरा करत असतानाच मोठी दुर्घटना टळली असून यात भारतीय खेळाडूचाही सहभाग होता. भारताचा सायकलपटू विश्वजित सिंग याच्यासोबत मोठा अपघात टळला आणि या अपघातानं सर्वांचं लक्ष वेधून गेलं. रविवारी दुपारी पुरुषांची 15 किमी स्क्रॅच शर्यत सुरू असताना हा अपघात झाला. शर्यतीचा दहावा लॅप सुरू असताना सायकलस्वार एकमेकांवर आदळले. लंडनमधील ली व्हॅली वेलो पार्क येथे सुरू असलेल्या या शर्यतीत आठ रायडर्स एकमेकांवर आदळले. या अपघातात इंग्लंडचा ऑलिम्पिक चॅम्पियन मॅट वॉल्सचाही समावेश असून त्याला टाके पडले आहेत. त्याचवेळी कॅनडाच्या मॅट बोस्टोक आणि डेरेक जी यांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, या लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

पाहा हा अपघाताचा व्हिडीओ

प्रेक्षकही दुखावले गेले

या अपघातात केवळ सायकलस्वारच जखमी झाले नाही तर एक प्रेक्षकही जखमी झाला असून तो व्हीलचेअरवरून बाहेर पडला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक दयालराम जाट यांनी ही माहिती दिली. या अपघाताविषयी बोलताना त्याने विश्वजीतबद्दल सांगितलं की, तो जखमी खेळाडूंच्या मागे होता पण महत्त्वाच्या वेळी त्यानं डोक्याचा वापर करून ब्रेक लावला.

हायलाईट्स

  1. रविवारी दुपारी पुरुषांची 15 किमी स्क्रॅच शर्यत सुरू असताना हा अपघात
  2. शर्यतीचा दहावा लॅप सुरू असताना सायकलस्वार एकमेकांवर आदळले
  3. लंडनमधील ली व्हॅली वेलो पार्क येथे सुरू असलेल्या या शर्यतीत आठ रायडर्स एकमेकांवर आदळले
  4. या अपघातात इंग्लंडचा ऑलिम्पिक चॅम्पियन मॅट वॉल्सचाही समावेश असून त्याला टाके पडले आहेत
  5. कॅनडाच्या मॅट बोस्टोक आणि डेरेक जी यांनाही रुग्णालयात नेण्यात आलं

शेवटच्या लॅपमध्ये विश्वजीत मागासलेला

विश्वजीतने प्रथमच या खेळांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामना 60 लॅप्सचा होता. सिंग भक्कमपणे आघाडीवर होता पण शेवटच्या लॅपमध्ये तो मागे राहिला आणि नंतर दंडही ठोठावण्यात आला ज्यामुळे त्याच्यावर ‘डिड नॉट फिनिश’ चा टॅग चिकटला. याबद्दल प्रशिक्षक म्हणाले, ‘पण एकंदरीत मला आनंद आहे की विश्वजीत या वेदनादायक अपघातातून वाचला आणि अंतिम फेरीत पोहोचला.’

लंडनमधील पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जाट म्हणाले की, ‘अशा कठीण काळात योग्य वेळी ब्रेक मारण्यासाठी उत्कृष्ट कौशल्य लागतं आणि त्यानं तेच केलं. ते खूप वेदनादायक होतं. असा अपघात मी कधीच पाहिला नाही. आम्ही थोडा वेळ घाबरलो.’