नवी दिल्ली : भारताची महिला कुस्तीपटू पूजा गेहलोतने राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG 2022) शनिवारी देशाला आणखी एक पदक मिळवून दिलंय. तिनं 50 किलो वजनी गटात स्कॉटलंडच्या क्रिस्टेल लेमोफेकचा 12-2 ने पराभव करून कांस्यपदक जिंकलं. या खेळांमधील कुस्तीतील भारताचे हे सातवे पदक आहे. याआधी शुक्रवारी सहा भारतीय कुस्तीपटू (CWG 2022 Wrestling) मॅटवर उतरले होते आणि सर्वच पदक जिंकण्यात यशस्वी ठरले होते. स्कॉटलंडच्या क्रिस्टेल लेमोफेकनं सुरुवातीला पूजाला (Pooja Gehlot) चांगली झुंज दिली. त्यांनी खाली उतरवून दोन गुण घेतले आणि पूजावर दबाव आणायचा होता. यानंतर पूजाने शानदार पुनरागमन करत प्रतिस्पर्ध्याला सांभाळण्याची संधी दिली नाही. पूजाने टेकडाउन लागू केले आणि नंतर तिच्या प्रतिस्पर्ध्याच्या खेळाडूला गुंडाळत गुण गोळा करून तिची आघाडी 10-2 अशी केली. यानंतर आणखी दोन गुण घेत 10 गुणांचा फरक केला आणि तांत्रिक कार्यक्षमतेच्या जोरावर विजय मिळवला.
POOJA WINS BRONZE ?
U-23 World Championships Silver Medalist and debutant #PoojaGehlot ?♀️ (W-50kg) bags ?after defeating Scotland’s Letchidjo by technical superiority (12-2) ?
Amazing Gutwrench by Pooja to take the 8 points lead ? Complete dominance ?#Cheer4India pic.twitter.com/N7Z7CkFZVd
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2022
महिलांच्या 50 किलो वजनी गटात पूजाने स्कॉटलंडच्या क्रिस्टेल एल हिला तांत्रिक श्रेष्ठतेने पराभूत केले. यानंतर कॅमेरूनच्या रेबेका अँडोलो मुआम्बोवर वॉकओव्हर झाला. उपांत्य फेरीत तिला कॅनडाच्या मॅडिसन बियान्का पार्क्सकडून पराभव पत्करावा लागला असला तरी मॅडिसनने अंतिम फेरीत धडक मारली आणि त्यामुळे पूजाला कांस्यपदकाचा सामना खेळण्याची संधी मिळाली जिथे ती जिंकली.
भारतीय बॉक्सर जस्मिनने उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टनचा पराभव केला. अशाप्रकारे जस्मिनने बॉक्सिंगमध्ये भारताचे 5 वे पदक निश्चित केले आहे. जास्मिनने उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टेनचा 4-1 असा पराभव केला. आता या भारतीय महिला बॉक्सरकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.