Marathi News Sports Conor mcgregor lionel messi cristiano ronaldo dak prescott and lebron james is world highest paid athletes in forbes list 2021
PHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर
फोर्ब्सने (Forbes List 2021) क्रीडा विश्वातील सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी (Highest Paid Athletes) जाहीर केली आहे. गेल्या 1 वर्षात ज्या खेळाडूंनी सर्वाधिक कमाई केली आहे त्यांना या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.
1 / 6
Forbes ने 2021 मधील श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. Forbes ने ही यादी गेल्या 12 महिन्यातील कमाईच्या आधारावर जाहीर केली आहे. या यादीमध्ये 3 खेळातील 5 खेळाडूंनी सर्वाधिक कमाईबाबत टॉप 5 मध्ये स्थान पटकावलं आहे.
2 / 6
कॉनोर मॅकग्रेगोर (Conor McGregor) : आयर्लंडचा हा खेळाडू कमाईच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आहे. मॅकग्रेगोरने 12 महिन्यात 180 मिलियन डॉलर म्हणजेच 13 अब्ज, 24 कोटी, 20 लाख 42 हजार रुपये कमावले आहेत. यामधील 1 अब्ज, 61 कोटी, 83 लाख, 57 हजार 400 रुपये हे खेळाच्या माध्यमातून कमावले आहेत. तर 11 अब्ज, 62 कोटी, 19 लाख, 58 हजार 600 रुपये हे इतर माध्यमातून कमावले आहेत.
3 / 6
लिओनेल मेस्सी (Lionel Messi) : अर्जेन्टीनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. मेस्सीने खेळाच्या आणि इतर उत्पन्नाच्या माध्यामातून 130 मिलियन डॉलर म्हणजेच 9 अब्ज, 56 कोटी, 30 लाख, 86 हजार रुपयांची कमाई केली आहे.
4 / 6
ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्टियानो रोनाल्डो कमाईबाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोने मागील 12 महिन्यात 120 मिलियन डॉलर म्हणजेच 8 अब्ज, 82 कोटी, 77 लाख, 40 हजार कमाई केली आहे.
5 / 6
डाक प्रेस्कॉटने (Dak Prescott) : अमेरिकेचा स्टार फुटबॉलर डाक प्रेस्कॉटने या यादीत चौथं स्थान पटकावलं आहे. डाकने फुटबॉलच्या माध्यामातून 107.5 मिलियन डॉलर म्हणजेच 7 अब्ज, 90 कोटी, 85 लाख, 27 हजार 750 रुपये कमावले आहेत.
6 / 6
लेब्रॉन जेम्स (Lebron James) : अमेरिकेचा बास्केटबॉल प्लेअर लेब्रॉन जेम्स फोर्ब्सच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. जेम्सने गेल्या 12 महिन्यात 96.5 मिलियन डॉलर कमावले आहेत.