मुंबई | टीम इंडिया सध्या आशिया कप 2023 स्पर्धेत खेळतेय. आशिया कपनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कप 2023 ला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आता वर्ल्ड कपचं वातावरण तयार झालं आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, एकूण 10 संघांना 5 सप्टेंबरपर्यंत आपल्या संघातील खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जवळपास निश्चित झाली आहे. येत्या काही तासांमध्ये बीसीसीआय निवड समिती या खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आहे.
आयसीसीच्या नियमानुसार वर्ल्ड कपसाठी प्रत्येक टीममध्ये 15 खेळाडूंचा समावेश करता येणार आहे. बीसीसीआय निवड समितीने आशिया कपसाठी 1 राखीव खेळाडूसह 17 सदस्यीय मुख्य संघ जाहीर केला. या 17 खेळाडूंमधूनच वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्यामुळे आता निवड समिती या 17 पैकी 15 मध्ये कुणाला संधी देतं याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ निश्चित झाला आहे. आशिया कपच्या 18 सदस्यीय संघातून वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंची निवड होणार आहे. या 18 मधून तिघांना डच्चू निश्चित आहे. या तिघांमध्ये तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन आहेत.
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याची आशिया कपमध्ये दुखापतीनंतर निवड करण्यात आली. मात्र यानंतर केएल आशिया कपमधील पहिल्या 2 सामन्यात उपलब्ध नाही. केएलला दुखापतीमुळे 2 सामन्यात खेळता येणार नाही. मात्र वर्ल्ड कपसाठी संघ निवडीआधी बीसीसीआय मेडिकल टीमने केएल फिट असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे केएल वर्ल्ड कप निवडीसाठी उपल्बध असणार आहे.
वर्ल्ड कप 2023 साठी 15 सदस्यीय संभावित टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (राखीव विकेटीकपर), रवींद्र जेडजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.