U17 Fifa World Cup
Image Credit source: social
नवी दिल्ली : सध्या क्रीडाप्रेमींना अनेक स्पर्धा सुरु होणार असल्याच्या बातम्या मिळतायत. काही दिवसांपूर्वी टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड झाली. यातच आता आणखी एक स्पर्धा येणार आहे. एआयएफएफवरील (AIFF) बंदी उठल्यानंतर भारत आता 17 वर्षांखालील विश्वचषकाचं (U17 Fifa World Cup) यजमानपदासाठी सज्ज झाला आहे. भारताने फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची ही दुसरी वेळ आहे. भारताने यापूर्वी 2017 मध्ये पुरुषांच्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केलं होतं. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत या स्पर्धेच्या आयोजनासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ठाकूर यांनी स्पर्धेच्या बजेटपासून या स्पर्धेचे महत्त्वाचं अपडेट्स दिलं आहे.
अनुराग ठाकूर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे जाणून घ्या…
- 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनासाठी हमीपत्रावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे क्रीडामंत्र्यांनी सांगितले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2300 कोटींचा अर्थसंकल्प दिला आहे.
- 2017 मध्ये पुरूषांचा FIFA U-17 विश्वचषक ज्या प्रकारे आयोजित करण्यात आला होता त्याच पद्धतीने त्याचे आयोजन केले जाईल.
- 11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा देशातील तीन शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होणार.
- एकूण 32 सामने खेळवले जाणार आहेत. नवी मुंबई, गोवा आणि भुवनेश्वर हे सामने आयोजित करणार आहेत.
- ‘फुटबॉलची आवड असलेल्या महिला खेळाडूंना यातून चालना मिळेल. यासोबतच फुटबॉल या खेळाला देशभरात अधिक लोकप्रियता मिळेल.
- देशातील महिलांना अधिक प्रेरणा मिळेल. देशाच्या मुली सातत्याने चांगला खेळ दाखवत असल्याचे आपण पाहिले आहे.
- या स्पर्धेत यजमान भारताला फुटबॉलच्या ‘पॉवरहाऊस’ ब्राझील, मोरोक्को आणि यूएस या संघांसह कठीण अ गटात ठेवण्यात आले आहे. ब गटात जर्मनी, नायजेरिया, चिली आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. गतविजेत्या स्पेनला कोलंबिया, चीन आणि मेक्सिकोसह क गटात ठेवण्यात आले आहे. ड गटात जपान, टांझानिया, कॅनडा आणि फ्रान्सला स्थान देण्यात आले आहे.
- भारतीय संघ 11 ऑक्टोबरला (मंगळवार) भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर अमेरिकेविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल.
- मोरोक्कोविरुद्ध दुसरा सामना 14 ऑक्टोबरला (शुक्रवारी) होणार आहे. यजमान संघ गट फेरीचा सामना 17 ऑक्टोबर (सोमवार) रोजी ब्राझील विरुद्ध होणार आहे.
- 2017 मध्ये 17 वर्षांखालील पुरुष विश्वचषक आयोजित करून भारत दुसऱ्यांदा फिफा स्पर्धेचे आयोजन करत आहे. जरी तो पहिल्या फेरीच्या पलीकडे भरला नाही