मुंबई | भारतात यंदा 12 वर्षांनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला फायनल खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेतील एकूण 48 सामन्यांचं आयोजन हे देशातील 10 शहरांमध्ये करण्यात आलंय. अहमदाबाद, धर्मशाळा, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरु, मुंबई आणि कोलकाता येथे आयोजित करण्यात आले आहेत.
वेळापत्रक जाहीर होताच काही लोकप्रतिनिधिंनी आमच्या शहरात सामने आयोजित न केल्याने बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली होती. नागपूरचे आमदार अनिल देशमुख, काँग्रेस खासदार शशी थरुर आणि पंजाबचे क्रीडा मंत्री गुरुमीत सिंह मीत हेयर यांनी आपल्या शहरात वर्ल्ड कप सामन्याचं आयोजन न केल्यावरुन नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. या नाराजीची दखल बीसीसीआय सचिव जय शाह यांनी घेतली. तसेच ज्या शहरांमध्ये वर्ल्ड कप सामने होणार नाहीत, तिथे इतर मालिकेतील अधिकाअधिक सामने होतील, असं म्हटंल होतं. त्यानुसार आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या 2023-24 या वर्षासाठी होम सिजनचं वेळापत्रक प्रसिद्ध केलंय. त्यानुसार टीम इंडिया भारतातचं एकूण 11 शहरांमध्ये 16 सामने खेळणार आहे. यामध्ये 5 कसोटी, 3 एकदिवसीय आणि टी 20 सामन्यांचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया हे सर्व सामने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे.
विशेष बाब म्हणजे वर्ल्ड कप सामन्यांसाठी ज्या शहरांचा विचार करण्यात आला नाही, तिथे हे सर्व सामने होणार आहे. हे 18 सामने एकूण 11 शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. मोहाली, इंदूर, राजकोट, वायझॅग, त्रिवेंद्रम, गुवाहाटी, नागपूर, हैदराबाद, बंगळुरु, रांची आणि धर्मशाळा अशी या या 11 शहरांची नावं आहेत.
ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंडचा भारत दौरा
https://twitter.com/BCCI/status/1683836910907826176
दरम्यान टीम इंडिया या होम सिजनमधील वेळापत्रकानुसार 18 सप्टेंबर ते 7 मार्च 2024 पर्यंत एकूण 4 मालिका खेळणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे.
अफगाणिस्तान नववर्षात भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 11 ते 17 जानेवारी दरम्यान 3 मॅचची टी 20 सीरिज खेळेल.
त्यानंतर इंग्लंड भारत दौऱ्यावर येईल. इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध 5 मॅचची टेस्ट सीरिज खेळेल. इंग्लंड एकूण 2 महिने भारत दौऱ्यावर असणार आहे. 20 जून ते 11 मार्च असा हा इंग्लंड दौरा असणार आहे.