IND vs WORLD XI: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत वि वर्ल्ड इलेव्हन, अशी असेल दोन्ही टीम्सची Playing 11

| Updated on: Jul 28, 2022 | 3:11 PM

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं (Team india) दमदार प्रदर्शन सुरु आहे. खासकरुन छोट्या फॉर्मेट मध्ये भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. क्रिकेट चाहत्यांना टी 20 वर्ल्ड कपची प्रतिक्षा आहे.

IND vs WORLD XI: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत वि वर्ल्ड इलेव्हन, अशी असेल दोन्ही टीम्सची Playing 11
Team india
Follow us on

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं (Team india) दमदार प्रदर्शन सुरु आहे. खासकरुन छोट्या फॉर्मेट मध्ये भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. क्रिकेट चाहत्यांना टी 20 वर्ल्ड कपची प्रतिक्षा आहे. पण वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचा जागतिक क्रिकेट मधील सर्वोत्तम खेळाडूंच्या संघाबरोबर सामना होऊ शकतो. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघ आणि वर्ल्ड इलेव्हन मध्ये (India vs Worl XI) सामना खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पुढच्या महिन्यात देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सरकारने क्रिकेट सामन्याच्या आयोजनाचा प्रस्ताव दिला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल, वेगवेगळ्या कार्यक्रमांसह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं आयोजन केलं आहे.

कधी होणार ही मॅच?

क्रिकेटची लोकप्रियता लक्षात घेऊन सरकाराला क्रिकेटचाही समावेश करायचा आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने क्रिकेट बोर्डाला प्रस्ताव पाठवला आहे. ज्यात 22 ऑगस्टला भारतीय संघ आणि वर्ल्ड इलेव्हन मध्ये सामन्याचा प्रस्ताव दिला आहे. दिल्लीच्या फिरोझ शाह कोटला स्टेडियम मध्ये ही मॅच होऊ शकते.

किती खेळाडूंची गरज?

“आम्हाला भारत सरकारकडून टीम इंडिया आणि वर्ल्ड इलेव्हन मध्ये सामना आयोजित करण्याचा प्रस्ताव मिळाला आहे. वर्ल्ड इलेव्हनसाठी कमीत कमी 13 ते 14 खेळाडूंची आवश्यकता आहे. त्यावेळी कोण उपलब्ध असेल, त्याची माहिती घ्यावी लागेल” असं बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितलं.

भारताचा संभाव्य झिम्बाब्वे दौरा 20 ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणारे खेळाडू कदाचित 22 ऑगस्टला उपलब्ध नसतील. झिम्बाब्वे दौऱ्यावर बीसीसीआय व्हीव्ही एस लक्ष्मण यांच्या कोचिंगखाली आपली ‘बी’ टीम पाठवू शकते. विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि केएल राहुल हे खेळाडू 22 ऑगस्टला उपस्थित होऊ शकतात.

अशी असू शकते दोन्ही टीम्सची संभाव्या प्लेइंग 11

भारतीय संघ – रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्रा जाडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार,

वर्ल्ड XI – केन विलियमसन, जोस बटलर, डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, डेविड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, शाकिब अल हसन, ट्रेट बोल्ट, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, राशिद खान