शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या निकाहमधील तो रोमँटिक व्हायरल, सानिया मिर्झा…

| Updated on: Jan 23, 2024 | 3:20 PM

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसतंय. मात्र, यावर दोघांनीही भाष्य करणे टाळले. थेट तिसऱ्या निकाहाचे फोटोच शोएब मलिक याने सोशल मीडियावर शेअर केले. फक्त शोएब मलिक हाच नाही तर सना जावेद हिला देखील सोशल मीडियावर टार्गेट केले जातंय.

शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या निकाहमधील तो रोमँटिक व्हायरल, सानिया मिर्झा...
Shoaib Malik Sana Javed Age Difference
Follow us on

मुंबई : पाकिस्तानी क्रिकेटर आणि सानिया मिर्झा हिचा पती शोएब मलिक याने नुकताच तिसरा निकाह केला. शोएब मलिक याच्या लग्नाची बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. शोएब मलिक याने 2010 मध्ये सानिया मिर्झा हिच्यासोबत हैद्राबाद येथे निकाह केला. मात्र, अचानक पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत तिसरा निकाह केला. शोएब मलिक याच्या या तिसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच त्यावर जोरदार टीका करण्यात येतंय. हेच नाही तर अनेकांनी सानिया मिर्झालाही  खडेबोल सुनावण्यास सुरूवात केली.

सना जावेद आणि सना जावेद यांच्या लग्नाचे काही खास फोटो व्हायरल होताना दिसले. मात्र, आता नुकताच एक फोटो समोर आलाय. हा फोटो यापूर्वी व्हायरल झाला नव्हता. पहिल्यांदाच हा फोटो समोर आलाय. या फोटोमध्ये सना जावेद आणि शोएब मलिक हे दोघे रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. हा फोटो अत्यंत खास दिसतोय.

या फोटोमध्ये शोएब मलिक आणि सना जावेद यांनी पांढरे कपडे घातल्याचे दिसतंय. विशेष म्हणजे हा फोटो देखील त्यांच्या लग्नातीलच असल्याचे सांगितले जातंय. सना जावेद हिचा देखील हा दुसरा विवाह आहे. पाकिस्तानी अभिनेत्यासोबत सना जावेद हिचा पहिला निकाह झालेला. मात्र, तो फार जास्त काळ टिकू शकला नाही.

 

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा मुलगा चार वर्षांचा आहे. आता घटस्फोटानंतर या मुलाचा सांभाळ शोएब आणि सानिया हे दोघेही मिळू करणार असल्याचे सांगितले जाते. सानिया मिर्झा ही लग्नानंतर दुबई येथे शिफ्ट झालीये. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे दुबईमध्ये आलिशान असे घर देखील आहे. सानिया त्याच घरात मुलासोबत राहते.