मुंबई : आयपीएलच्या (IPL) पुढील पाच हंगामांसाठी म्हणजेच 2023 ते 2027साठी मीडिया हक्कांच्या (Media Rights) लिलाव (Auction) झाला अशून हा व्यवहार 43 हजार कोटींमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे. आज लिलावाचा दुसरा दिवस असून मीडिया हक्क विकत घेणाऱ्यांचं नाव मात्र समोर आलेलं नाही. दुसऱ्या दिवसाची प्रक्रिया सुरू असताना ही माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय उपखंडासाठी टीव्ही आणि डिजिटल अधिकार विकले गेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार टीव्हीचे हक्क प्रति सामना 57 कोटी आणि डिजिटल हक्क 48 कोटी प्रति सामन्याला विकले गेले आहेत. त्यांची एकूण बोली 43,255 कोटी आहे. टीव्ही पॅकेज 23,575 कोटी रुपयांना आणि डिजिटल पॅकेज 19,680 कोटी रुपयांना विकले गेले. मात्र, विकत घेणाऱ्यांची नावं समोर आलेली नाही.
IPL Media Rights Day-2: Bidding value for TV, digital goes upto Rs 43,255 crore
Read @ANI Story | https://t.co/2eoNHvRRRt#IPLMediaRights #IPLAuction #IPL #BCCI #CricketTwitter pic.twitter.com/qvoXgmVXol— ANI Digital (@ani_digital) June 13, 2022
हे सुद्धा वाचा
सप्टेंबर 2017 मध्ये Star Indiaने 16 हजार 347.50 कोटी रुपयांची बोली लावून 2017 ते 2022 या कालावधीसाठी मीडिया हक्क विकत घेतले होते. त्यांनी सोनी पिक्चर्सचा पराभव केला. या करारानंतर आयपीएल सामन्याची किंमत जवळपास 55 कोटी रुपयांवर गेली होती. 2008 मध्ये, सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने 8,200 कोटी रुपयांच्या बोलीवर 10 वर्षांसाठी मीडिया हक्क जिंकले.
तीन वर्षांच्या कालावधीसाठी IPL चे जागतिक डिजिटल अधिकार नोव्ही डिजिटलला 2015 मध्ये ₹302.2 कोटींमध्ये देण्यात आले होते.
आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले. सोनीने प्रथम त्याच्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले. 2008 ते 2017 पर्यंत 8,200 कोटी रुपयांना मीडिया अधिकार मिळवले होते. तेव्हा ऑनलाइन प्रक्षेपण नव्हते. यानंतर बीसीसीआयने 2018 मध्ये मीडिया हक्कांसाठीचे अधिकार पुन्हा विकले. यावेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने सोनीचा पराभव केला.