मुंबई : यंदा वन डे वर्ल्ड कप 2023 भारतामध्ये होणार असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप थराराला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कपला काही दिवस बाकी असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. टीम इंडियामध्ये आता काही प्रयोग केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ही सर्व तयारी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे, अशातच एका माजी खेळाडूने दोन खेळाडूंच्या निवडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौरा सुरू असताना आयर्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या मालिकेमध्ये जसप्रीत बुमराहकडे संघाच्या कर्णधारडपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसं पाहायला गेलं तर या मालिकेमध्ये जसप्रीत बुमराह वगळता सर्व युवा खेळाडू आहेत. यातील कित्येक खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना दिसतील. माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा याने दोन खेळाडूंची या मालिकेमध्ये निवड न झाल्याने टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आकाश चोप्राने आपल्या यू-ट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्यात आलं आहे. पण के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोन खेळाडूंची नाव का नाहीत. राहुल आणि अय्यरच्या फिटनेसबाबत अजून काही प्रश्न आहेत का? असा सवालही त्याने उपस्थित केला. जसप्रीत बुमराह 24 कॅरेट सोनं आहे मात्र अनेकवेळा त्याने कमबॅक केलं आणि परत दुखापतीमुळे बाहेर झाला.
राहुल आणि अय्यर यांच्याबाबत बोलताना, दोघांची संघात नावं नाहीत म्हणजे ते आशिया कपची तयारी करू शकणार नाहीत का? जर दोघेही वर्ल्ड कप खेळू शकणार नसतील तर वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात असल्याचं आकाश चोप्रा म्हणाला.
दरम्यान, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध असणार आहे. यजमानपद भारताकडे असल्याने त्याचा टीम इंडियाला मोठा फायदा होणार आहे.