मुंबई : वर्ल्ड कप 2023 सूरू असून यंदा टीम इंडिया वर्ल्ड कपवर नाव कोरणारा असल्याचं दिसत आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नसून आता सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. देशभर वर्ल्ड कप सुरू असताना मिस्टर 360 म्हणून जगभरात आपली ओळख केलेला एबी डिव्हिलियर्सही भारतात आहे. एबीने मुंबईतील अंडर 19 खेळाडूंचा सामना पाहिला आणि त्यांची भेट घेत संवाद साधला.
ऑल हार्ट क्रिकेट अकादमीद्वारा संचालित माहीममध्ये किशोर एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2023-24 चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुखस पाहुणा म्हणून दिनेश कार्तिक याला बोलावलं होतं. एमसीएचे सचिवअजिंक्य नाईक आणि जे.टी. सचिव दीपक पाटील यांच्यासह सर्वोच्च परिषद सदस्य अभय हडप आणि कौशिक गोडबोले उपस्थित होते. या अंडर 19 संघाला भेट देणाऱ्या खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिक, एबी डिव्हिलियर्स, व्यंकटेश अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, राहुल त्रिपाठी यांचा समावेश होता.
उद्घाटन समारंभाची सुरुवात दिनेश कार्तिक यांच्या प्रस्तावनेने आणि प्रेरणादायी संबोधनाने झाली. या स्पर्धेचे आयोजन प्रशिक्षक अभिषेक नायर आणि संघाने एमसीएच्या मदतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अजिंक्य नाईक आणि कार्तिक यांच्या हस्ते विजेत्या ट्रॉफीचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर नाईक यांनीही नवोदित क्रिकेटपटूंशी संवाद साधला. यावेळी एबी डिव्हिलियर्सने शिवाजी पार्कला भेट दिली आणि मुंबई क्रिकेट आणि स्पर्धेबाबतची माहिती घेतली.
दरम्यान, एबीने खेळाडूंशी संवाद साधत मार्गदर्शन केलं, नव्या दमाच्या खेळाडूंनीही जगभर दहशत केलेल्या या स्टार खेळाडूने दिलेले क्रिकेटचे धडे शिकून घेतले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या विक्रमांना एबीने गवसणी घातली आहे.