IPL 2024 : ‘सीएसकेने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये धोनीचं नाव पाहून…’; ए बी डिव्हिलियर्सची माहीबाबत मोठी भविष्यवाणी!

| Updated on: Nov 30, 2023 | 5:13 PM

AB de Villiers Prediction About MS Dhoni : सीएसकेमध्ये कोणताही खेळाडू असला तरी धोनीशिवाय तो संघ काही पूर्ण होत नाही. अशातच धोनीबाबत मिस्टर 360 खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या ए बी डिविलियर्सने मोठी भविष्यवाणी केली आहे.

IPL 2024 : सीएसकेने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये धोनीचं नाव पाहून...; ए बी डिव्हिलियर्सची माहीबाबत मोठी भविष्यवाणी!
Follow us on

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यंदाच्या आयपीएलमध्येही खेळणार असल्याने सर्व चाहत्यांना आनंद झाला आहे. माही 2024 नंतरच्या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं बोललं जात होतं. मात्र सीएसके संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये धोनीचं नाव आहे. सीएसकेमध्ये कोणताही खेळाडू असला तरी धोनीशिवाय तो संघ काही पूर्ण होत नाही. अशातच धोनीबाबत मिस्टर 360 खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या ए बी डिविलियर्सने मोठी भविष्यवाणी केली आहे.

धोनीबाबत काय म्हणाला ए बी?

रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये महेंद्र सिंग धोनीचं नाव पाहून खूप आनंद झाला. मागील सीझन संपल्यानंतर धोनीची शेवटच आयपीएल असल्याच्या चर्चा होत होत्या, मात्र धोनीने नेहमीसारखं आश्चर्यचकित केलं. येत्या तीन सीझनमध्ये धोनी खेळणार आहे. पण आत्ताच काही ठामपणे सांगू शकत नसल्याचं ए बी डिव्हिलियर्स म्हणाला.

आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरता टायटन्स संघाचा पराभव केला. या सामन्यामध्ये शेवटच्या दोन चेंडूवर रविंद्र जडेजाने सिक्सर आणि चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. या विजयासह सीएसके आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा संघ ठरला आहे. धोनीने मागील सीझनमध्ये 16 सामने खेळले आणि यामध्ये 104 धावा केल्या होत्या. यामधील धोनीची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 32 धावा इतकी होती.

दरम्यान, धोनीच्या आयपीएलमध्ये एकूण 5082 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या असून त्यामध्ये धोनीने 250 सामने खेळले आहेत. यामध्ये एकूण त्याने 24 अर्धशतके केली असून त्यामध्ये 84 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनीने 2008 साली आयपीएलने पदार्पण केलं होतं. पहिल्या सीझनमध्ये धोनीने 16 सामन्यात 414 धावा केल्या होत्या.