मुंबई : यंदाचा वन डे वर्ल्ड कप 2023 टीम इंडियासाठी महत्त्वाचा असून सर्व टीम मॅनेजमेंट वन डे सामन्यामध्ये संघात मोठे बदल करताना दिसत आहे. युवा खेळाडूंना संधी देत कायम डोकेदुखी ठरत असलेल्या चार नंबरसाठी कोणाला संधी द्यायची हे अजुनही काही निश्चित नाही. सूर्यकुमार यादव वन डे फॉरमॅटमध्ये चमकताना दिसत नाहीये. के.एल. राहुल आणि श्रेयश अय्यर दुखापतीतून सावरले आहेत पण वर्ल्ड कपपर्यंत ते फिट राहतात की नाही याबाबतही साशंकता आहे. अशातच यावर बोलताना दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू ए बी डिव्हिलियर्स याने याबाबत आपलं मत मांडलं आहे.
विराट कोहली याने चार नंबरला खेळायला यावं कारण तो योग्य प्रकारे डाव पुढे नेऊ शकतो. विराटला तीन नंबरला फलंदाजी करायला आवडते हे मला माहित आहे. मात्र त्याने वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवत संघाच्या गरजेनुसार फलंदाजीला यायला हवं, असं ए बी डिव्हिलियर्स आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला.
विराट कोहलीला चेज मास्टर म्हणूनही ओळखलं जातं, लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने अनेक सामने एकहाती फिरवत संघाला विजय मिळवून दिले आहेत. विराट तीन नंबरलाचा फलंदाजासाठी उतरला आहे मात्र ओपनिंग खराब झाल्यावर मिडल ऑर्डर तितकी मजबूत नसल्याचं अनेक सामन्यात दिसून आलं.
दरम्यान, मिस्टर 360 म्हणजेच ए बी च्या मते विराटने चार नंबरला फलंदाजीसाठी उतरावं, त्यामुळे आता यावर विराट काही प्रतिक्रिया देतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.