IPL 2023 : मुंबईला आयपीएलची पहिली ट्रॉफी जिंकून देणाऱ्या स्टार खेळाडूची निवृत्ती

| Updated on: Feb 04, 2023 | 10:45 PM

आयपीएल सुरू होण्याआधीच मुंबई इंडिअन्सला (Mumbai Indians) जिंकून देणाऱ्या मॅचविनर खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून हा खेळाडू खेळला आहे.

IPL 2023 : मुंबईला आयपीएलची पहिली ट्रॉफी जिंकून देणाऱ्या स्टार खेळाडूची निवृत्ती
Follow us on

 मुंबई : नुकताच आयपीएलचा लिलाव (IPL Auction 2023) पार पडला असून यामध्ये काही दिवसातच आयपीएल होणार आहे. सर्व क्रीडा प्रेमींना आयपीएलची उत्सुकता लागली असून आतुरतेने चाहते वाट पाहत आहेत. मात्र आयपीएल सुरू होण्याआधीच मुंबई इंडिअन्सला (Mumbai Indians) जिंकून देणाऱ्या मॅचविनर खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून हा खेळाडू खेळला आहे. भारताच्या अंडर-19 वर्ल्ड (Under-19 World Cup) कप संघाचाही हा खेळाडू भाग राहिला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही तर अबू नेचिम आहे. नेचिम याने आपल्या निवृत्तीबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

मुंबईने 2013 साली पहिल्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यावेळी नेचिम मुंबईच्या संघाचा भाग होता. 2013 च्या सीझनमध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या फायनल सामन्यात नेचिमला संघात स्थान मिळालं नव्हतं. 2010 मध्ये नेचिमला मुंबईने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होतं.

आयपीएलचे 4 हंगाम अबू नेचिम मुंबई इंडिअन्सच्या ताफ्यात होता.  2014 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये गेला. अबू नेचिमने आयपीएलमध्ये 17 सामने खेळले असून यामध्ये त्याने 8.69 च्या ईकॉनॉमीने 12 बळी घेतले आहेत. 2006 सालच्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. या सामन्यामध्ये त्याने 14 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.

आयपीएलमध्ये 2010 साली सचिन तेंडुलकर सरांना पहिल्यांदा भेटलो होतो. त्यावेळी त्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं माझ्या कारकिर्दीमधील सर्वात मोठा क्षण असून तो कायम आठवणीत राहणारा असल्याचं अबू नेचिमने स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं. आसामकडून आयपीएल खेळणारा अबू नेचिम हा पहिला खेळाडू आहे. त्यानंतर आता रियान पराग हा दुसरा आसामचा खेळाडू आहे जो आयपीएल खेळत आहे.

आयपीएलच्या 16 व्या मोसमासाठी मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, टिम डेव्हिड, रमनदीप सिंह, टिळक वर्मा, झाय रिचर्डसन, पियूष चावला, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, देवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, ड्यून जॉनसन, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल, झाय रिचर्डसन आणि आकाश मधवाल.