टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांच्या मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. त्याआधी क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काउन्सिलने आगामी आशिया कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. अंडर 19 आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 2 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीसह एकूण 13 सामने होणार आहेत.
या स्पर्धेचं आयोजन हे 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे यूएईत खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने एकाच वेळी सुरु होणार आहे. सामन्यांना स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहेत. हा आशिया कप वनडे फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा दुबई येथे होणार आहे. या सलामीच्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे.
टीम इंडियाचा या स्पर्धेतील पहिला सामना हा शनिवारी 30 नोव्हेंबरला होणार आहे. भारताचा पहिलाच सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.त्यामुळे या सामन्याची साऱ्या क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.
अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेचं वेळापत्रक
The generation next, is ready to battle it out at the #MensU19AsiaCup2024 starting November 29 🗓️. The action-packed tournament will be contested across Dubai and Sharjah with the finals being contested on December 8.🏆#ACC pic.twitter.com/lkaoPWSNFR
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) November 8, 2024
भारत विरुद्ध पाकिस्तान, शनिवार 30 नोव्हेंबर, दुबई
भारत विरुद्ध जपान, सोमवार 2 डिसेंबर, शारजाह
भारत विरुद्ध यूएई, बुधवार 4 डिसेंबर, शारजाह
सेमी फायनल 1, शुक्रवार 6 डिसेंबर, दुबई
सेमी फायनल 2, शुक्रवार 6 डिसेंबर, शारजाह
फायनल, रविवार 8 डिसेंबर, दुबई
या स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, यूएई आणि जपानचा समावेश आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, यूएई आणि जपानचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि नेपाळचा समावेश आहे.