कोलंबो | पाकिस्तान ए क्रिकेट टीमने एमर्जिंग आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पाकिस्तानने श्रीलंकेवर 60 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानची फायनलमध्ये पोहचण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. पाकिस्तानकडून श्रीलंकेला विजयासाठी 323 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा बाजार 45.4 ओव्हरमध्ये 262 धावांवर आटोपला.
पाकिस्तान ए टीम आशिया कप फायनलमध्ये
Pakistan 'A' advances to the finals after a nail-biting 60-run victory against Sri Lanka 'A'. In response to Pakistan's 322, Sri Lanka showed resistance but could only manage 262 in the end.#ACCMensEmergingTeamsAsiaCup #ACC pic.twitter.com/r9lk66XqWx
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) July 21, 2023
पाकिस्तानकडून ओमर युसूफ आणि कॅप्टन मोहम्मद हरीस या दोघांच्या अर्धशतकानंतर अर्शद इक्बाल याने 5 विकेट घेतल्या. ही तिकडी पाकिस्तानच्या विजयाची शिल्पकार ठरली. आता पाकिस्तानसमोर अंतिम सामन्यात सेमी फायनल 2 मध्ये विजयी होणाऱ्या संघाचं आव्हान असणार आहे. सेमी फायनल 2 मध्ये टीम इंडिया ए विरुद्ध बांगलादेश ए आमनेसामने आहेत.
श्रीलंकेची 323 रन्सचं पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. पाकिस्तानने श्रीलंकेला झटपट 3 झटके दिले. मात्र अविष्का फर्नांडो आणि सहान अरचिगे या दोघांनी चांगली लढत दिली. मात्र दुर्देवाने दोघेही नर्व्हस नाईन्टीचे शिकार झाले. दोघेनी 97 धावांवर आऊट झाले.अविष्का याने 85 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 12 फोरसह 97 रन्स केल्या. तर सहानने 109 चेंडूत 1 सिक्स आणि 12 फोरसह 97 धावा केल्या. या दोघांचा अपवाद वगळता सर्वांनी निराशा केली.
श्रीलंकेचे दोघे भोपळा न फोडता माघारी परतले. प्रमोद मधुशन 1 रनवर नाबाद राहिला. दोघे 1 रन करुन आऊट झाले. दोघांनी प्रत्येकी 10 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन दुनिथ 14 आणि आशेन बंडारा 17 रन्स करुन आऊट झाला.
अर्षद इक्बाल याचा श्रीलंकेला पंच
Pakistan 'A' advances to the finals after a nail-biting 60-run victory against Sri Lanka 'A'. In response to Pakistan's 322, Sri Lanka showed resistance but could only manage 262 in the end.#ACCMensEmergingTeamsAsiaCup #ACC pic.twitter.com/r9lk66XqWx
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) July 21, 2023
पाकिस्तानकडून अर्षद इक्बाल याने 7.4 ओव्हरमध्ये 37 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. मुबसिर खान आणि सुफियान मुकीम या दोघांनी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अमद बट याने एकमेव विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानने ओमर यूसुफ याच्या 88 आणि कॅप्टन मोहम्मद हॅरीस याच्या 52 आणि मुबासिर खान याच्या 42 धावांच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये ऑलआऊट 322 रन्स केल्या. इतर फलंदाजांनीही चांगली खेळी केली, त्यामुळे पाकला 300 पार मजल मारता आली. श्रीलंकेकडून एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी 5 जणांमधून तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. दोघांना 1-1 विकेट मिळाली. तर दोघे अपयशी ठरले.
श्रीलंका ए प्लेईंग इलेव्हन | दुनिथ वेललागे (कॅप्टन), अविष्का फर्नांडो, लसिथ क्रुसपुल्ले, मिनोद भानुका (विकेटकीपर), पासिंदू सूरियाबंदरा, सहान अरचिगे, लाहिरू समरकून, अशेन बंदारा, चमिका करुणारत्ने, दुशन हेमंथा आणि प्रमोद मदुषे.
पाकिस्तान ए प्लेईंग इलेव्हन | मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सॅम अयुब, तय्यब ताहिर, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, मुबासिर खान, अमद बट, मोहम्मद वसीम जूनियर, अर्शद इक्बाल आणि सुफियान मुकीम.