ACC Emerging Asia Cup : युएईचा संघ अवघ्या 107 धावांवर गारद, टीम इंडियासमोर सोपं आव्हान

| Updated on: Oct 21, 2024 | 8:36 PM

आशिया कप स्पर्धेत भारताचा दुसरा सामना युएईसोबत सुरु आहे. साखळी फेरीतील या सामन्यानंतर भारताचं उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामने जिंकताच उपांत्य फेरीचं स्थान पक्कं होईल.

ACC Emerging Asia Cup : युएईचा संघ अवघ्या 107 धावांवर गारद, टीम इंडियासमोर सोपं आव्हान
Image Credit source: video grab
Follow us on

एसीसी इमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेच्या आठवा सामना भारत अ आणि युएई या संघात होत आहे. या सामन्यावर भारताची पकड दिसली. युएईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. युएईला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले त्यामुळे त्यातून सावरता आलं नाही. त्यानंतर राहुल चोप्राना युएईसाठी चांगली खेळी केली. मधल्या टप्प्यात 50 चेंडूत 50 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 3 षटकार मारले. या व्यतिरिक्त कर्णधार बसील हमीदने 22 धावा केल्या. तसेच इतर फलंदाज स्वस्तात बाद झाले. आर्यांश शर्मा 1, निलांश केसवानी 5, विष्णून सुकुमारन 0, सय्यद हैदर 4, संचित शर्मा 0, मुहम्मद फारूख 7, मुहम्मद उल्लाह 1 या धावसंख्येवर तंबूत परतले. भारताकडून रसिख सलामने भेदक गोलंदाजी केली. त्याने 2 षटकात फक्त 15 धावा देत 3 गडी बाद केले. तर रमनदीप सिंगने 2 विकेट घेतल्या. त्याचबरोबर अंशुल कंबोज, वैभव अरोरा, अभिषेक शर्मा आणि नेहल वढेरा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ थेट उपांत्य फेरी गाठणार आहे. युएईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच 16.5 षटकात सर्व गडी गमवून 107 धावा केल्या आणि विजयासाठी 108 धावांचं आव्हान दिलं आहे. आता भारतीय संघ हे आव्हान कसं गाठतो याकडे लक्ष लागून आहे. भारताचा पुढचा सामना ओमानसोबत 23 ऑक्टोबरला होणार आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. त्यापैकी पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचा मार्ग सोपा झाला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), तिलक वर्मा (कर्णधार), नेहल वढेरा, आयुष बदोनी, रमनदीप सिंह, निशांत सिंधू, अंशुल कंबोज, राहुल चाहर, रसिक सलाम, वैभव अरोरा.

यूएईची प्लेइंग इलेव्हन : आर्यांश शर्मा, मयंक कुमार, विष्णु सुकुमारन, राहुल चोपड़ा, सैयद हैदर (विकेटकीपर), बासिल हमीद (कर्णधार), नीलांश केसवानी, सचित शर्मा, मो. फारूक, मोहम्मद जवादुल्लाह, ओमिद रहमान..