Pakistan vs India | पाकिस्तान विरुद्ध बुधवारी हायव्होल्टेज सामना, टीम इंडिया विजयाची हॅटट्रिक पूर्ण करणार?

| Updated on: Jul 19, 2023 | 12:03 AM

Asia Cup 2023 PAK vs IND | अखेर टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात बुधवारी 19 जुलै रोजी आशिया कप स्पर्धेत कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या महामुकाबल्याबाबत एका क्लिकवर सर्व काही जाणून घ्या.

Pakistan vs India | पाकिस्तान विरुद्ध बुधवारी हायव्होल्टेज सामना, टीम इंडिया विजयाची हॅटट्रिक पूर्ण करणार?
Follow us on

कोलंबो | एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया ए ने नेपाळला पराभूत करत सेमी फायनलचं तिकीट नक्की केलं. यश धूल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. यूएई आणि त्यानंतर नेपाळला पराभवाची धूळ चारत टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकले. आता टीम इंडियाचा बुधवारी 19 जुलै रोजी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.आपण या महामुकाबल्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात

बुधवारी पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया कडवी झुंज

हे सुद्धा वाचा

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना केव्हा खेळवण्यात येणार?

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना हा बुधवारी 19 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामन्याचं आयोजन कुठे करण्यात आलंय?

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए या सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलंय.

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए महामुकाबला कुठे पाहता येणार?

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए या हायव्होल्टेज सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीम

सॅम अयुब (कॅप्टन), मोहम्मद हारिस (विकेटकीप), साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, कामरान गुलाम, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मोहम्मद वसीम जूनियर, सुफियान मुकीम, अर्शद इक्बाल, शाहनवाज दहनी, मेहरान मुमताज, हसीबुल्ला खान, मुबासिर खान आणि अमद खान बट.

टीम इंडिया

यश धुल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, मानव सुथार, हर्षित राणा, नितीश रेड्डी, आरएस हंगरगेकर, आकाश सिंग, युवराजसिंह डोडिया, प्रभसिमरन सिंग आणि प्रदोष पॉल.