कोलंबो | यश धूल याच्या नेतृत्वात टीम इंडिया ए ने एसीसी मेन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने नेपाळ ए चा 9 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. नेपाळने विजयासाठी दिलेलं 168 धावांचं आव्हान टीम इंडियाने अवघ्या 22.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने 139 धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. मात्र नेपाळ कॅप्टन रोहित पौडेल याने ही जोडी फोडली. अभिषेकने 69 बॉलमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 87 धावांची खेळी केली. त्यानंतर साई आणि ध्रुव जुरेल या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. साईने 52 बॉलमध्ये 58 धावांची नाबाद खेळी केली. ध्रुवने नॉट आऊट 21 रन्स केल्या.
टीम इंडियाचा मोठा विजय
2️⃣ wins in a row for India 'A' ?
A clinical chase ensures a nine-wicket win against Nepal ?
Scorecard – https://t.co/XoxpSdeexC…#ACCMensEmergingTeamsAsiaCup | #ACC pic.twitter.com/wehE5JRIVH
— BCCI (@BCCI) July 17, 2023
त्याआधी नेपाळने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र नेपाळचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारतीय गोलंदाजांनी नेपाळला सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके द्यायला सुरुवात केली आणि ऑलआऊट करुनच शांत राहिले.
नेपाळकडून कॅप्टन रोहित पौडेल 65 आणि गुलसन झा याने 38 धावांची खेळी केली आणि लाज राखली. या दोघांनी केलेल्या या खेळीमुळे नेपाळला ऑलआऊट 39.2 ओव्हरमध्ये 167 धावांपर्यंत मजल मारता आली. निशांत सिंधू याने सर्वाधिक 4 विकेट्स, राजवर्धन हंगरगेकर 3 आणि हर्षित राणा याने 2 विकेट्स घेतल्या. तर मानव सुतार याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
टीम इंडिया ए प्लेइंग इलेव्हन | यश धूल (कॅप्टन), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकीन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, नितीश रेड्डी आणि राजवर्धन हंगरगेकर.
नेपाळ ए प्लेइंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), देव खनाल, भीम शार्की, कुशल मल्ला, गुलसन झा, सोमपाल कामी, पवन सराफ, किशोर महतो आणि ललित राजबंशी.