हाँगकाँग | पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा आशिया कप स्पर्धा 2023 मधून डब्बा गूल झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. एसीसी वूमन्स एमर्जिंग टीम्स एशिया कप स्पर्धेतील दुसरा सेमी फायनल सामना पार पडला. पावसामुळे हा सामना 9 षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात बांगलादेश विरुद्ध आमनेसामने होते. बांगलादेशने या 9 ओव्हरच्या सामन्यात पाकिस्तानचा 6 धावांनी धुव्वा उडवला. बांगलादेशने या विजयासह अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता 21 जून रोजी टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात कपसाठी लढाई होणार आहे.
बांगलादेशने टीमने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशने 9 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 59 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 9 ओव्हरमध्ये 60 धावांचं आव्हान मिळालं.
बांगलादेशकडून नाहिदा अकतर हीने सर्वाधिक 21 धावांची खेळी केली. तर राबिया खान हीने नाबाद 10 धावा केल्या. दोघींनी भोपळाही फोडता आला नाही. तर 4 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सुल्ताना खातून 6 धावांवर नाबाद परतली.
पाकिस्तानकडून कॅप्टन फातिमा सना हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अनूशा नासिर हीने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर तुबा हसन हीने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.
बांगलादेशची अशी वाईट दुर्दशा झाल्याने आता पाकिस्तानच मॅच जिंकणार असं चित्र निर्माण झालं होतं. बांगलादेशचा पराभव होणार म्हणून फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळणार असं क्रिकेट चाहत्यांमध्ये वातावरण होतं. मात्र क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडत नाही, तोवर काहीही म्हणता येत नाही, असं म्हणतात ते उगीच नाही.
पाकिस्तानची 60 धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली. मात्र त्यानंतर बांगलादेशने कमबॅक केलं. बांगलादेशने पाकिस्तानला अवघ्या 21 धावा देऊन 4 झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानची 1 बाद 26 वरुन 4 बाद 47 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतरही पाकिस्तानने शेवटच्या ओव्हरपर्यंत लढत दिली. पण पाकिस्तानचे प्रयत्न अपुरे पडले. पाकिस्तानला 9 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 53 धावाच करता आल्या. त्यामुळे बांगलादेशचा 6 धावांनी विजय झाला.
बांगलादेशचा विजय
Bangladesh 'A' are through to the finals! In a shortened fixture, ?? batters struggled but a late flourish helped them to 59 in 9 overs. In reply, the ?? batters never got going, eventually falling short by 6 runs. #WomensEmergingTeamsAsiaCup #ACC pic.twitter.com/zmglortRXW
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) June 20, 2023
पाकिस्तानकडून शवाल झुल्फिकार हीने 11, आयमान फातिमा 18, सदफ शमास 8 आणि नतालिया परवेझ हीने 2 धावा केल्या. तर कॅप्टन फातिमा सना हीने नाबाद 10 आणि सईदा शाह हीने नॉट आऊट 3 रन्स केल्या. बांगलादेशकडून रबिया खान हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मरुफा अकतर आणि नाहिदा अक्तर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतली.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन | लता मोंडल (कॅप्टन), शाठी राणा, दिलारा अक्टर (विकेटकीपर), शोभना मोस्तरी, मुर्शिदा खातून, नाहिदा अक्टर, राबेया खान, सुलताना खातून, मारुफा अक्तर, शोर्ना अक्टर आणि संजिदा अक्तर मेघला.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | फातिमा सना (कर्णधार), शवाल झुल्फिकार, आयमान फातिमा, सदफ शमास, नतालिया परवेझ, गुल फिरोजा, नजिहा अल्वी (विकेटकीपर), उम्मे हानी, तुबा हसन, सय्यदा अरूब शाह आणि अनुशा नसीर.