मुंबई | आशियाई क्रिकेट समिती अर्थात एसीसीने 15 जून रोजी आशिया क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. एसीसीने ट्विट करत स्पर्धेचं हायब्रिड पद्धतीने आयोजन करण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसेच स्पर्धेची सुरुवात आणि शेवट केव्हा होणार याबाबतही माहिती दिली. या दरम्यान सामनेनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. या एकूण 6 संघाची 2 गटांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान ग्रुप एमध्ये आहेत.
टीम इंडिया आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असल्याने क्रिकेट चाहत्यांना निश्चितच हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. आता एसीसी केव्हा वेळापत्रक जाहीर करतंय याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत-पाक यांच्यात होणार सामना रद्द करण्याता निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
हाँगकाँगमध्ये महिला एमर्जिंग आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील भारत ए आणि पाकिस्तान ए यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आगे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार होती. मात्र सामन्याआधी पावसानेच जोरदार बॅटिंगला सुरुवात केली. त्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय वूमन्सने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
सामना पावसामुळे रद्द
? Update from Hong Kong ?
The India 'A'-Pakistan 'A' game has been abandoned due to rain ?️
? Asian Cricket Council #WomensEmergingTeamsAsiaCup | #ACC pic.twitter.com/R21DvIVCgC
— BCCI Women (@BCCIWomen) June 17, 2023
दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत या स्पर्धेत केवळ 1 सामना खेळला आहे. तर 2 सामना पावसामुळे होऊ शकले नाहीत. यजमान हाँगकाँग विरुद्ध टीम इंडियाने 9 विकेट्सने शानदार विजय मिळवत जोरदार सुरुवात केली. यानंतर नेपाळ आणि पाकिस्तान विरुद्ध होणारे सामने पावसामुळे रद्द झाले. दोन्ही सामने रद्द झाल्याने टीम इंडिया दोन्ही सामन्यांचे प्रत्येकी 1 असे एकूण 2 पॉइंट्स मिळाले. त्यामुळे टीम इंडियाचे 4 पॉइंट्स झाले. टीम इंडियाने अशा प्रकारे सेमी फायनलमध्ये धडक मारली.
वूमन्स ए टीम इंडिया| श्वेता सेहरावत (कर्णधार), उमा चेत्री (विकेटकीपर), गोंगडी त्रिशा, सौम्या तिवारी, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, तीतस साधू, कशवी गौतम, पार्श्वी चोप्रा, मन्नत कश्यप, बरेड्डी अनुषा, मुस्कान मलिक, ममता माडीहद्दीवाला, ममता माडीवाला आणि यशश्री.
वूमन्स ए पाकिस्तान टीम | फातिमा सना (कॅप्टन), नजीहा अल्वी (विकेटकीपर), शवाल जुल्फिकार, एमान फातिमा, सदफ शमास, नतालिया परवेझ, गुल फिरोजा, उम्मे हानी, तुबा हसन, सय्यदा आरूब शाह, अनुशा नसीर, लुबना बेहराम, युसरा अमीर आणि गुलरुख.