मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 14 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात सुरु आहे.उत्तर प्रदेशातील लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये हा सामना सुरु आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामना काही काळ थांबवावा. त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. पण सामना सुरु असताना धुळीचं वादळ उठलं. यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला अडचण झाली. श्रीलंकेचा डाव सुरु असताना 43 व्या षटकात अशी स्थिती निर्माण झाली. वाऱ्याचा वेग इतका जबरदस्त होता की, स्टेडियममधील होर्डिंग खाली पडलं.
सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी वेळीच संकट ओळखलं आणि तेथून पळ काढला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. यावेळी ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षक स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या डोळ्यात धूळ गेल्याने अस्वस्थ झाले होते.
Scary scenes at Ekana Stadium, Lucknow.
Hoardings are falling and fans running for cover. #AUSvSL #SLvsAUS #AUSvsSL #SLvAUS #JayShah #WorldCup2023pic.twitter.com/qUy1gzRQ8z
— Vikrant Gupta 🏏 (@VikrantGupta75) October 16, 2023
Due to strong winds, hoardings are falling all over Lucknow's Ekana Stadium.
Spectators running for safety.#CWC23 #AUSvSL #WorldCup2023 #Lucknow @BCCI @ICC pls remove these banners before the next match. pic.twitter.com/xxoqK775jK— Ali Taabish Nomani (@atnomani) October 16, 2023
श्रीलंकेचा संपूर्ण संघ 43.3 षटकात 209 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं आहे. पाथुम निसांका आणि कुसल परेरा यांची चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 125 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला. 75 धावांमध्ये दहा गडी बाद झाले. एडम झाम्पाने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले. तर ग्लेन मॅक्सवेलला 1 गडी बाद करण्यात यश आलं. पाथुम निसांकाने 61, तर कुसल परेरा याने 78 धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश तीक्षना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.