क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टेनकोविक या दोघांच्या घटस्फोटाची सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळत आहेत. मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी मिळाल्यापासून हार्दिक पंड्याला सोशल मीडियावरील टीकेचा सामना करावा लागतोय. मुंबई आयपीएलच्या 17 व्या हंगामातून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली. हार्दिकवर त्यानंतर चहुबाजूने टीका करण्यात आली. आता आयपीएलनंतर ती टीका कुठे थांबत नाही, तोवर हार्दिक त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला. हार्दिकची पत्नी नताशाने इंस्टावरुन हार्दिक सोबतचे फोटे डिलीट केल्याचा दावा केला जात आहे. तसेच नताशाने इंस्टावरुन पंड्या हे आडनाव हटवल्याचा दावाही केला जात आहे.
नताशाने पंड्या हे आडनाव आणि हार्दिकसोबतचे फोटो हटवल्याने दोघांमध्ये धुसफुस असून घटस्फोट झाल्याची चर्चा आहे. दोघेही विभक्त झाल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिक-नताशा या दोघांबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहेत. मात्र यानंतरही दोघांनी मौनच पाळलंय. नताशाने घटस्फोटच्या चर्चेवरुन माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यामुळे या घटस्फोटाच्या चर्चेला आणखी हवा मिळालीय. नताशाने या दरम्यान एक इंस्टा स्टोरी पोस्ट केली होती. नताशाने इंस्टा स्टोरीत वाहतूक दिशादर्शकाचा एक फोटो पोस्ट करत “लवकरच कुणी रस्त्यावर येणार आहे”, असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर आणखी एक इंस्टा स्टोरी व्हायरल झाली आहे.
नतशाने काही वेळेपूर्वी इंस्टा स्टोरी शेअर केली आहे. नताशाने या इंस्टा स्टोरीला फक्त 2 शब्दांचं कॅप्शन दिलं आहे. नताशाने वांद्रे वरळी सागरी सेतूवरील गाडीने प्रवास करतानाचा व्हीडिओ स्टोरीत पोस्ट केला आहे. नताशाने या स्टोरीला “Praise god” असं कॅप्शन दिलंय. तसेच सोबत 3-4 इमोजीही टाकल्या आहेत. नताशाच्या या इंस्टा स्टोरीवरुन ती मुंबईतच असल्याचं स्पष्ट होतंय. नताशाची ही इंस्टा स्टोरी जोरदार व्हायरल झाली आहे. नताशाला या इंस्टा स्टोरीतून तिला देवाची आठवण येतंय, असा अर्थ यातून काढला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला हार्दिक पंड्या परदेशात टी 20 वर्ल्ड कपआधी मजामस्ती करतोय.
नताशाची इंस्टा स्टोरी व्हायरल
टीम इंडियाची पहिली तुकडी 2 जूनपासून सुरु होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अमेरिकेत पोहचली आहे. तर लवकरच दुसरी आणि शेवटची तुकडी उड्डाण भरणार आहे. हार्दिक पहिल्या तुकडीत नव्हता. त्यामुळे उपकर्णधार हार्दिक दुसऱ्या तुकडीसह रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे.