AUS vs AFG: अफगाणिस्तानला सेमी फायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी विजय महत्त्वाचा, कांगारुंना पराभूत करणार?

| Updated on: Jun 23, 2024 | 2:36 AM

Afghanistan vs Australia: अफगाणिस्तान क्रिकेट टीमने आतापर्यंत अनेक संघांना जेरीस आणलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानपासून सावध रहावं लागणार आहे.

AUS vs AFG: अफगाणिस्तानला सेमी फायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी विजय महत्त्वाचा, कांगारुंना पराभूत करणार?
AFG VS AUS CRICKET
Follow us on

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 48 व्या आणि सुपर 8 मधील आठव्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. हा सामना सेंट विंसेंट किंग्सटाऊन अर्नोस वले स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला 23 जून रोज भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तान सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात पराभूत झाली आहे. त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी करो या मरो असा आहे. तसेच अफगाणिस्तान या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाचा वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पराभवाचा हिशोब क्लिअर करण्याचा प्रयत्नात असणार आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. ग्लेन मॅक्सवेल याने त्याने सामन्यात चेस करताना ऐतिहासिक द्विशतक ठोकलं होतं.

राशिद खान याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान खेळणार आहे. तर मिचेल मार्शकडे ऑस्ट्रेलियाची सूत्रं आहेत. साखळी फेरीत धमाका केल्यानंतर कांगारुंनी सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. तर दुसऱ्या बाजूला सुपर 8 मधील सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानला टीम इंडियाकडून पराभूत व्हावं लागलं. अशात अफगाणिस्तानसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना हा महत्त्वाचा आहे.तर ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून सेमी फायनलचा दावा आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे डोळे लागून आहेत.

अफगाणिस्तान कांगारु विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज

ऑस्ट्रेलिया संघ: मिचेल मार्श (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, नॅथन एलिस आणि ॲश्टन एगर.

अफगाणिस्तान टीम: राशीद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज(विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, करीम जनात, मुजीब उर रहमान, मोहम्मद इशाक आणि नांगेलिया खरोटे.