AUS vs AFG: अफगाणिस्तान विरूद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया कॅप्टन संतापला, म्हणाला…

| Updated on: Jun 23, 2024 | 2:36 PM

Afghanistan vs Australia Super 8: अफगाणिस्तान विरुद्ध झालेला पराभव ऑस्ट्रेलिया कॅप्टन मिचेल मार्शला पचनी पडला नाही. मिचलने पराभवासाठी कुणाला कारणीभूत ठरवलं?

AUS vs AFG: अफगाणिस्तान विरूद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया कॅप्टन संतापला, म्हणाला...
mitchell marsh
Follow us on

अफगाणिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. सुपर 8 फेरीतील सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने होते. अफगाणिस्तानसाठी हा करो या मरो असा सामना होता. या सामन्यात अफगाणिस्तानने 148धावा केल्या. तर त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 19.2 ओव्हरमध्ये 127 धावांवर गुंडाळलं.अफगाणिस्तानचा हा सुपर 8 मधील पहिलाच विजय ठरला. अफगाणिस्तानच्या या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. तर ऑस्ट्रेलिया कॅप्टन मिचेल मार्श याला पराभव सहन झालेला नाही. मार्श पराभवानंतर काय म्हणाला? हे जाणून घेऊयात

मिचेल मार्श काय म्हणाला?

“आम्हाला विजयासाठी कदाचित 20 धावा जास्त मिळाल्या. या स्पर्धेत अनेक संघांनी आधी बॉलिंग केली आहे. असं नाही की टॉसमुळे हार जीत झाली आहे. आम्ही चांगली कामगिरी केली नाही. खेळपट्टटी सोपी नव्हती, मात्र दोन्ही संघ या खेळपट्टीवर चांगले खेळले. आज आम्ही पराभूत झालो. आम्हाला फक्त विजयाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी यापेक्षा कोणतीही चांगली टीम नाही” असं मार्शने म्हटलं.

सामन्याचा धावता आढावा

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्य 6 विकेट्स गमावून 148 धावा केल्या. अफगाणिस्तनसाठी गुरबाज आणि झद्रान या सलामी जोडीने 118 धावांची शतकी भागीदारी केली. गुरबाजने 49 बॉलमध्ये 60 रन्स केल्या. तर झद्रानने 48 चेंडूत 51 धावांची खेळी केली. मात्र या सलामी जोडीनंतर इतर फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. पॅट कमिन्सने सलग दुसरी हॅट्रिक घेत अफगाणिस्तानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. अफगाणिस्तानकडून करीम जनात याने 13 आणि मोहम्मद नबीने 10 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स याने 3 तर एडम झॅम्पाने 2 विकेट्स घेतल्या. तर मार्क्स स्टोयनिसने 1 विकेट घेतली.

तर 149 धावांचा पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानने पहिल्या ओव्हरपासून झटके द्यायला सुरुवात केली आणि ऑलआऊट करुन विषय संपवला. अफगाणिस्तानने 19.2 ओव्हरमध्ये कांगारुंचा 127 धावांवर कार्यक्रम केला आणि 21 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून एकट्या ग्लेन मॅक्सवेल याने सर्वाधिक 59 धावांची खेळी केली. मात्र त्याला विजय मिळवून देण्यात यश आलं नाही. तर कॅप्टन मिचेल मार्श आणि मार्कस स्टोयनिस या दोघांनी अनुक्रमे 12 आणि 11 अशा धावा केल्या. आक्रमक ओपनर ट्रेव्हिस हेड आला तसाच आऊट होऊन गेला. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नईबने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. नवीन उल हकने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अझमतुल्लाह ओमरझई, मोहम्मद नबी आणि राशिद खान या तिघांनी 1-1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, ॲश्टन अगर, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन: राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.