मुंबई | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं काउंटडाऊन सुरु झालंय. टीम इंडियाचे खेळाडू हे वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाले आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने या कसोटी आणि वनडे सीरिजसाठी टीम इंडियाचा संघ 23 जून रोजी जाहीर केला होता. मात्र टी 20 सीरिजसाठी अजूनही टीमची घोषणा करण्यात आलेली नाही. या दरम्यान क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
निवड समितीने टी 20 मालिकेसाठी टीमची घोषणा केलीय. निवड समितीने चक्क 24 वर्षांच्या खेळाडूला कर्णधारपद दिलंय. अफगाणिस्तान क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभयसंघात एकमेव कसोटी सामना पार पडला. त्यानंतर आता वनडे आणि टी 20 मालिका पार पडणार आहे. या दोन्ही मालिकांचं वेळापत्रक आणि टी 20 सीरिजसाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघ जाहीर करण्यात आलाय. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिलीय.
राशिद खान याच्याकडे कॅप्टन्सी
Afghanistan have named a 16-member squad for their two-match T20I series against Bangladesh.
More ?https://t.co/U5kAqdr3sn
— ICC (@ICC) July 2, 2023
निवड समितीने 24 वर्षीय स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान याच्याकडे टी 20 मालिकेचं नेतृत्व सोपवण्यात आलंय.
5 जुलै, पहिला एकदिवसीय, चट्टोग्राम
8 जुलै, दुसरी वनडे, चट्टोग्राम
11 जुलै, तिसरा एकदिवसीय, चट्टोग्राम
14 जुलै, पहिला सामना, सिलहट
16 जुलै, दुसरा सामना, सिलहट
बांगलादेश विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम अफगाणिस्तान | रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, हजरतुल्ला झझाई, मोहम्मद शहजाद, इब्राहिम जद्रान, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, सेदिक अटल, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, वफादर मोमांद, फरीद अहमद मलिक, नूर अहमद आणि मुजीब उर रहमान.