टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रंगला. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. अफगाणिस्ताने तशीच खेळी करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. पण या सामन्यावर पावसाचं गडद सावट होतं. त्यामुळे क्रीडाप्रेमी आणि अफगाणी प्लेयर्सची धाकधूक वाढली होती. पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं गेलं. पण प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 105 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पण या सामन्यातील एक प्रसंग क्रीडाप्रेमींच्या स्मरणात राहणारा ठरला. सामन्यात वारंवार पावसामुळे खंड पडत होता. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार गणित बदलत होतं. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या गुलबदीने नईबने एक चलाखी केल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. त्याने असं काही केलं की सामना काही काळ थांबवणं भाग पडलं.
अफगाणिस्तानकडून 12वं षटक नूर अहमद टाकत होता. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडू दरम्यान मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी खेळाडूंना पाऊस येईल असा इशारा केला. खेळाडूंना वाटलं की, खेळ संथ गतीने करायचा आहे. मग काय क्षेत्ररक्षण करणाऱ्या गुलबदीने नईबने पाय पकडून मैदानात पडला. असं भासवलं की असह्य वेदना होत आहेत. या दरम्यान नवीन उल हक आणि सपोर्ट स्टाफ त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले. त्याच्या जागेवर नजीबुल्लाह जाद्रान फिल्डिंगसाठी आला.
This has got to be the most funniest thing ever 🤣 Gulbadin Naib just breaks down after coach tells him to slow things down 🤣😂 pic.twitter.com/JdHm6MfwUp
— Sports Production (@SportsProd37) June 25, 2024
जसा गुलबदीन बाहेर गेला तर पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एक षटक कमी करण्यात आलं. त्यामुळे बांगलादेशला विजयासाी 19 षटकात 114 धावांचं आव्हान दिलं. गुलबदीन बाहेर गेल्याने राशीद खान नाराज झाला होता. 13व्या षटकात गुलबदीन पुन्हा मैदानात आला आणि 15 वं षटकही टाकलं आहे. इतकंच काय तंजीम हसनची विकेटही काढली. त्यामुळे गुलबदीनच्या या कृतीचं सोशल मीडियावर हसं होत आहे. मीम्सही व्हायरल होत आहेत.
In victory celebration Gulbadin running faster whole team.. 🤣🤣#Afgvsban #Banvsafg pic.twitter.com/AnmLVK6Gy1
— भाई साहब (@Bhai_saheb) June 25, 2024
Gulbadin Naib 😭🤣🤣
(But mass raa Afghanistan 🇦🇫❤️🫡❤️🔥)#T20WC pic.twitter.com/VSS0NRvXsK— firangi (@Maheshh_Dasari) June 25, 2024
गुलबदीन मैदानात पडला तेव्हा बांगलादेशचे 81 धावांवर 7 विकेट होते. डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा संघ पिछाडीवर होता. पुन्हा पाऊसा आणि सामना थांबवला गेला. पण पाऊस थांबताच सामना पूर्ण झाला. पण पाऊस पडतच राहिला असता आणि सामना रद्द करण्याची वेळ आली असती तर अफगाणिस्तान संघ जिंकला असता. आता आयसीसी या प्रकरणी काय कारवाई करते? याकडे लक्ष लागून आहे.