टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. जगभरातून अफगाणिस्तान संघाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडताना दिसतेय. सुपर-8 फेरीमध्ये अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मोठा उलटफेर केला. त्यानंतर टीम इंडियानेही ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अफगाणिस्तान संघाला संधी उपलब्ध करून दिली. शेवटच्या सामन्यात बांगलादेश संघाचा पराभव केला आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश करत इतिहास रचला. अफगाणिस्तान संघाचा आत्मविश्वास जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हा कारनामा करून दाखवला. पण बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात त्यांनी खेळलेल्या रडीच्या डावामुळे अफगाणिस्तान संघाने डाग लावून घेतला आहे.
अफगाणिस्तान संघासाठी बांगलादेशला पराभूत करण गरजेचं होतं. कारण या विजयामुळे त्यांचं सेमी फायनलचं तिकीट पक्क होणार होतं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 20 ओव्हरमध्ये 115-5 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने 12 ओव्हरमध्ये हे टार्गेट पूर्ण केलं असतं तर त्यांनाही सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी होती. मात्र 105 धावांवर बांगलादेश ऑल आऊट झाला. सामन्यात मोठी रंगत आली होती, दोन्ही संघांवर समसमान दबाव होते.
बांगलादेश आणि अफगाणिस्तान सामन्यात पावसाने अनेकवेळा खोडा घातला होता. पावसामुळे जर सामना रद्द झाला असता तर अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला असता. सामन्याच्या 12 व्या ओव्हरमध्ये कॅप्टन राशिद खान बॉलिंग करत होता, त्यावेळी पावसाने हजेरी लावली अफगाणिस्तान खेळाडूही घाबरले. कारण यावेळी पावसामुळे सामना थांबला असता तर डकवर्थ लुईस नियमानुसार अफगाणिस्तान संघ दोन धावांनी पुढे होता. यादरम्यान अफगाणिस्तानाचे कोच जोनाथन ट्रॉट यांनी खेळ स्लो करायला लावला. त्यांनी फक्त इशारा दिला आणि हा इशारा अफगाणिस्तान संघाचा खेळाडू गुलबदिन नायब ओळखला.
Once a legend said: sometimes it’s cramp , sometimes it’s acting. 😂
He deserves an Oscar dude.
Trott was asking them to slow down cz it’s raining 🌧️ and them Gulbadin Naib act started 😭#Afghanistan #T20WorldCup pic.twitter.com/lZsznZDnhI— Saad (@Saad_dogar77) June 25, 2024
राशिद खान बॉल टाकण्यासाठी येणार तितक्यात गडी खाली पडला. कारण त्याने आपल्या कोचचा इशारा समजला होता. सामना लांबला गेला आणि पाऊस आला तर अफगाणिस्तान संघ विजयी ठरणार होता. मात्र खिलाडूवृत्तीला हे कुठेतरी तडा देणारे आहे. इतके चांगले खेळले पण या एका गोष्टीमुळे त्यांच्यावर मजबूत टीका होताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग 11): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.
भारत (प्लेइंग 11): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.