शारजाह | अफगाणिस्तान क्रिकेट टीमने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा धुव्वा उडवला. शारजाहमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने 117 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली.तर दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात आयसीसी ऑलराउंडर रँकिंगमध्ये नंबर 1 असलेला अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी याने चमकदार कामगिरी केली.
आयर्लंडने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 236 धावा केल्या. तर आयर्लंडचा डाव हा 35 ओव्हरमध्ये 119 धावांवर आटोपला. नबीने आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवला. नबीने आधी 48 धावा केल्या. तर 5 विकेट्स घेतल्या. तर आयर्लंड विरुद्ध 172 धावा करणाऱ्या रहमनुल्लाह गुरुबाज याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
अफगाणिस्तानचा कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तर रहमानु्ल्लाह गुरबाज याने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर इब्राहीम झद्रान याने 22 धावा जोडल्या. तर आयर्लंडकडून मार्क अडायल याने 3 विकेट्स घेतल्या. तर आयर्लंडकडून कॅप्टन पॉल स्टर्लिंग याने 50 धावा केल्या. कर्टिस कॅम्फर याने 43 रन्स जोडल्या. या दोघांव्यतिरिक्त आयर्लंडकडून एकालाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर मोहम्मद नबी याने 5 तर नानग्याल खारोटी याने 4 विकेट्स घेतल्या.
मोहम्मद नबीने शारजाहमध्ये आयर्लंडमध्ये केलेल्या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला गूड न्यूज मिळाली आहे. मोहम्मद नबी यंदा आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. पलटणने नबीला 1 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. नबीला 17 व्या हंगामाआधी लय सापडल्याने मुंबई इंडियन्सच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.
मोहम्मद नबीची ऑलराउंड कामगिरी
The Player of the Match @MohammadNabi007 reacts to his all-round performance, the addition of Nangyal Kharoti into the AfghanAtalan lineup and the team’s overall performance in the 3rd match against Ireland. 👏#AfghanAtalan | #AFGvIRE2024https://t.co/OMLlpHKOya
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) March 12, 2024
आयर्लंड प्लेईंग ईलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर), जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेअर, अँडी मॅकब्राइन, बॅरी मॅककार्थी, थियो व्हॅन वोरकॉम आणि ग्रॅहम ह्यूम.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नांगयाल खरोती, नावेद झदरन, फझलहक फारुकी आणि अल्लाह गझनफर.