AFG vs SA : एकदिवसीय सामना 59 षटकांत ‘ओव्हर’, अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय

| Updated on: Sep 19, 2024 | 11:00 AM

Afghanistan v South Africa 1st Odi Highlights: अफगाणिस्तान क्रिकेट टीमने इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर 6 विकेट्सने मात करत पहिलावहिला आंतरराष्टीय सामना जिंकला आहे.

AFG vs SA : एकदिवसीय सामना 59 षटकांत ओव्हर, अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय
afghanistan cricket team
Image Credit source: afghanistan cricket X Account
Follow us on

अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना अवघ्या 59 षटकांमध्ये आटोपला आहे. अफगाणिस्तानने इतिहास रचत दक्षिण आफ्रिकेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं 107 धावांचं आव्हान अफगाणिस्तानने 24 ओव्हरआधीच पूर्ण केलं. अफगाणिस्तानने धारदार बॉलिंगच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 33.3 ओव्हरमध्ये 106 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर अफगाणिस्तानने 26 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केलं. अफगाणिस्तानने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी दुसरा सामना हा ‘करो या मरो’ असा असणार आहे.

अफगाणिस्तानची बॅटिंग

अफगाणिस्तानची विजयी धावांचा पाठलाग करताना घसरगुंडी झाली. अफगाणिस्तानने झटपट विकेट्स टाकल्या. मात्र आव्हान कमी असल्याने त्यांनी सहज विजय मिळवला. अझमतुल्लाह ओमरझई आणि गुलाबदीन नईब या जोडीने अफगाणिस्तानला विजयापर्यंत पोहचवलं. रहमानुल्लाह गुरुबाज 0, रहमत शाह 8, रियाझ हसन 16 आणि हशमतुल्लाह शाहिदी 16 धावांवर आऊट झाल्याने अफगाणिस्तानची स्थिती 4 बाद 60 अशी झाली. मात्र त्यानंतर अझमतुल्लाह आणि गुलाबदीन या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 47 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. गुलाबदीने या सर्वाधिक 34 धावा केल्या. तर अझमतुल्लाहने नॉट आऊट 25 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून ब्योर्न फोर्टुइन याने 2 विकेट्स घेतल्या. तर लुंगी एन्गिडी आणि कॅप्टन एडन मार्करम या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

पहिल्या डावात काय झालं?

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तानच्या बॉलिंगसमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव हा पत्त्यासारखा कोसळला. दक्षिण आफ्रिकेची 7 आऊट 36 अशी स्थिती झाली होती. मात्र विआन मुल्डर याने दक्षिण आफ्रकेची लाज राखली. विआनने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला 100 पार मजल मारता आली. विआनने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक 52 धावा केल्या. टॉनी डी झॉर्झी 11, काइल वेरेन 10 आणि ब्योर्न फोर्टुइन याने 16 धावा केल्या. चौघांना खातंही उघडता आलं नाही. दोघांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. नांद्रे बर्गर या 1 धावेवर नाबाद परतला. अफगाणिस्तानसाठी फझलहक फारुकी याने 4 विकेट्स मिळवल्या. अल्लाह गझनफरने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर राशिद खाने दोघांना आऊट केलं.

अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय

दरम्यान आता दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही स्थितीत दुसऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.

अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), रियाझ हसन, रहमत शाह, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, राशीद खान, अल्लाह गझनफर, फजलहक फारुकी आणि नांगेलिया खरोटे.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (विकेटकीपर), जेसन स्मिथ, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, ब्योर्न फोर्टुइन, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर.