लाहोर | अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात आशिया कप 2023 मधील साखळी फेरीतील सहावा आणि अखेरचा सामना खेळवण्यात येत आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या पाथुम निशांका आणि दिमुथ करुणारत्ने या सलामी जोडीने 63 धावांची आश्वासक भागीदारी केली. मात्र अफगाणिस्तानच्या बॉलिंगसमोर श्रीलंकेने ठराविक अंतराने विकेट्स गमावले. एका बाजुला श्रीलंकेचे विकेट जात होते. मात्र कुसल मेंडीस याने एक बाजू लावून धरली. कुसल शक्य तसं टॉप गिअर टाकून स्कोअरकार्ड धावता ठेवत होता. मात्र अफगाणिस्तानच्या राशिद खान याने आपल्या फिरकीसमोर एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेला बॅकफुटवर टाकलं.
राशिदची निर्णायक ओव्हर
Does Rashid Khan turn the game back into Afghanistan’s hands?
📸: Disney + Hotstar pic.twitter.com/TH01Ww5UfB
— CricTracker (@Cricketracker) September 5, 2023
राशिदने सामन्यातील 40 व्या ओव्हरमध्ये श्रीलंकेला 2 झटके दिले. त्यामुळे श्रीलंका काहीशी पिछाडीवर गेली. राशिदने या 40 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर कुसलला रनआऊट केलं. राशिदच्या 40 व्या ओव्हरमधील पहिलाच बॉल दासून शनाका याने मारला. दासूनने मारलेला फटका राशिदच्या दिशेने गेला. राशिदने कॅच सोडली. मात्र बॉल एक टप्पा घेऊन स्टंपला लागला. त्या दरम्यान नॉन स्ट्राईक एंडवर असलेला कुसल मेंडीस हा क्रीझहबाहेर होता. राशिदच्या हातून सुटलेला बॉल स्टंपवर एक टप्पा घेऊन गेला. अशाप्रकारे कुसल मेंडीस दुर्देवी ठरला आणि रनआऊट झाला. कुसल नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. कुसलने 84 बॉलमध्ये 92 धावा केल्या.
त्यानंतर राशिद खान याने त्याच ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर
कॅप्टन दासून शनाका याला क्लिन बोल्ड केलं. शनाका 5 धावांवर आऊट झाला. राशिदने अशा प्रकारे 2 विकेट घेतल्या. मात्र मेंडीस रनआऊट झाल्याने राशिदच्या खात्यात मात्र 1 विकेटच गेली. दरम्यान राशिदने 10 ओव्हमध्ये 63 धावा देऊन एकूण 2 विकेट्स घेतल्या.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.