Cricket : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, युवा खेळाडू मॅच फिक्सिंमध्ये दोषी, पाच वर्षांची बंदी

| Updated on: Aug 07, 2024 | 5:27 PM

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. युवा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये अडकला असून त्याच्यावर क्रिकेट बोर्डाने पाच वर्षांची बंदी घातली आहे. कोण आहे तो खेळाडू करियर सुरू झालं नाही तर आता संपण्याच्या मार्गावर आहे.

Cricket : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, युवा खेळाडू मॅच फिक्सिंमध्ये दोषी, पाच वर्षांची बंदी
Follow us on

टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये वन डे मालिका सुरू आहे. पहिला सामना टाय झाल्यावर दुसऱ्या सामन्याता विजय मिळवत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. 7 ऑगस्टला तिसरा सामना पार पडत असताना क्रिकट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट बोर्डाने युवा खेळाडूला पाच वर्षांसाठी बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खेळाडूवर मॅच फिक्सिंगचे आरोप असून त्यानेही ते मान्य केले आहेत. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अफगाणिस्तान संघाचा युवा खेळाडू एहसानुल्लाह जनात आहे. अफगाणिस्ता क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये त्याच्यावर बंदी घातली आहे. हा खेळाडू काबुल प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीझनमध्ये मॅच फिक्सिंगमध्ये दोषी सापडला होता. अफगाणिस्तानच्या खेळाडूने ACB आणि ICC अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केले असून त्यानेही आरोप स्वीकारले आहेत.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून माहिती

एहसानुल्लाह जनात आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या अनुच्छेद 2.1.1 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. ज्यामध्ये सामन्याचा निकालासह इतर गोष्टींमध्ये समावेश आहे. या मॅच फिक्सिंगमुळे त्याच्यावर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये बंदी घालण्यात येत आहे. जनात यानेही त्याच्यावर असलेले आरोप स्वीकारले असून त्याने मॅच फिक्सिंमध्ये,सहभागी असल्याची कबुली दिली आहे.

 

अफगाणिस्तान संघाकडून खेळणाऱ्या 26 वर्षीय एहसानुल्लाह जनातने 2017 मध्ये पदार्पण केलं होतं. अफगाणिस्तानकडून 16 वन डे, एक कसोटी आणि एक टी-20 सामना खेळला आहे. कमी वयात जनातने क्रिकेटच्या मैदानात पदार्पण केलं होतं.