मुंबई : आयपीएल 2024 लिलावाला अवघे काही तास बाकी राहिले आहेत. त्याआधी क्रिके विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडूल मोठा धक्का बसला असून त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. (Afghanistan Bowler Ban for 20 Month) फ्रँचायझीसोबत केलेल्या कराराच्या उल्लंघनामुळे त्याच्यावर 20 महिन्यांची बंदी घालण्यात आली आलीये. हा स्टार खेळाडू कोण आहे जाणून घ्या.
आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून हा खेळाडू खेळतो. लखनऊच्या टीम मॅनेजमेंटने यंदाच्या सीझनमध्ये रिटेन केलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अफगाणिस्तान खेळाडू नवीन उल हक आहे. नवीन उल याच्यावर ILT20 लीगमध्ये 2024 च्या सीझनसाठी बंदी घालण्यात आली आहे. नवीन उलने शारजाह वॉरियर्स संघासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर स्पर्धेच्या एका हंगामासाठी बंदी घालण्यात आली आहे.
शारजाह वॉरियर्ससाठी 2023 मध्ये नवीनने ILT20 चा पहिला हंगाम खेळला होता. त्यानंतर त्याला पूढच्याही हंगामामध्ये खेळण्यास सांगितलं. मात्र त्याने अॅग्रीमेंटसाठी नकर दिला. यानंतरशारजाह वॉरियर्स या संघाने नवीन उल हक विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नवीन याने वर्ल्ड कपनंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
Breaking: Naveen Ul Haq has been banned for 20 months from participation in International League T20 due to breach of contract – via CricTracker ❌
He has been picked by Peshawar Zalmi in the PSL 👀 #PSL9 #PSL2024 pic.twitter.com/qcvKlPmrrY
— Farid Khan (@_FaridKhan) December 18, 2023
आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली आणि नवीन उल हक एकमेकांना भिडले होते. त्यावेळी दोघांच्या भांडणानंतर विराट आणि गौतम गंभीर यांच्यामध्येही वाद झाला होता. आयपीएलमधील या वादानंतर नवीन उल हक चर्चेत आला होता. वर्ल्ड कपमध्ये दोघे आमने सामने आले तेव्हा विराटने आक्रमक न होता हा वाद मिटवता घेतला होता.