अफगाणिस्तान टीमने गेल्या काही वर्षात उल्लेखनीय कामगिरी करुन क्रिकेट विश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. अफगाणिस्तानने काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक मारली होती. तसेच अफगाणिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पहिल्यांदाच पात्र ठरली आहे. अफगाणिस्तान आता काही दिवसांनी बांगलादेश विरुद्ध यूएईत एकदिवसीय मालिका खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 19 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या 19 खेळाडूंमध्ये 2 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांमध्ये सेदिकुल्लाह अटल आणि नूर अहदमचा समावेश आहे.
हशमतुल्लाह शाहिदी या मालिकेत अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर रहमत शाह याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. तसेच इब्राहिम झद्रान आणि मुजीब उर रहमान या दोघांचा समावेश नाही. इब्राहीम आणि मुजीब या दोघांना दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे.
अफगाणिस्तान संघात सेदिकुल्लाह अटल याला इब्राहीम झद्रान याच्या जागी संधी देण्यात आली आहे. नूर अहमज याला मुजीब उर रहमानच्या जागी संधी देण्यात आली आहे. सेदिकुल्लाह अटल याने एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत 52, नाबाद 93 आणि 85 धावा केल्या होत्या.
तसेच संघात ऑलराउंडर राशिद खान आणि मोहम्मद नबी या अनुभवी ऑलराउंडर आणि माजी कर्णधारांच्या जोडीचा समावेश आहे. तसेच अझमतुल्लाह ओमरझई आणि फजल हक फारूकी यांचाही समावेश आहे. उभयसंघातील मालिकेतील सलामीचा सामना हा 6 नोव्हेंबरला होणार आहे. दुसरा सामना 9 तर तिसरा आणि अंतिम सामना हा 11 नोव्हेंबरला होणार आहे. तिन्ही सामने हे शारजाह येथेच आयोजित करण्यात आले आहेत.
पहिला सामना: 6 नोव्हेंबर, शारजाह
दूसरा सामना: 9 नोव्हेंबर, शारजाह
तिसरा सामना: 11 नोव्हेंबर, शारजाह
अफगाणिस्तान संघात कुणाला संधी?
Meet our #AfghanAtalan lineup for the @BCBtigers ODIs 🤩
📅: November 06 – 11
🏟: Sharjah Cricket Stadium, UAE🔗: https://t.co/iB3gfLmjsx#AfghanAtalan | #AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/SJB8JNwgfS
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 22, 2024
बांगलादेश विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तान टीम : हशमतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमत शाह (उपकर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), अब्दुल मलिक, रियाज हसन, सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, गुलबदीन नैब, राशिद खान, नांग्याल खरोती , एएम गजनफर, नूर अहमद, फजल हक फारूकी, बिलाल सामी, नवीद जादरान आणि फरीद अहमद मलिक.