अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 42 वा सामना हा दक्षिण आफ्रिकेने जिंकला. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तान क्रिकेट टीमवर 5 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा हा साखळी फेरीतील होता जो जिंकला. तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानला शेवट गोड करण्यात अपयश आलं. अफगाणिस्तानचा या सामन्यासह वर्ल्ड कप 2023 मधील प्रवास इथेच संपला. अफगाणिस्तान टीमचा खेळलेल्या 9 पैकी 5 सामन्यात पराभव झाला. तर 4 सामन्यात विजय मिळवण्यात यळ आलं. अफगाणिस्तानने 4 पैकी 3 विजय हे विश्व विजेत्या संघाविरुद्ध मिळवले. अफगाणिस्तानला सेमी फायनलमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आलं. मात्र अफगाणिस्तानने जाता जाता पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 असलेल्या टीम इंडियाला मोठा झटका दिला. अफगाणिस्तानने टीम इंडियाला मागे टाकत नंबर 1 टीम ठरली आहे.
अफगाणिस्तानने वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या कामगिरीने सर्वांना चकीत केलं. अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या 3 वर्ल्ड कप विजेत्या संघांचा धु्व्वा उडवला. तर नेदरलँड्सवरही मात केली. अफगाणिस्तानला सेमी फायनलमध्ये येण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवामुळे सर्व समीकरण चुकलं. अफगाणिस्तानला एक चूक महागात पडली. मात्र अफगाणिस्तानने टीम इंडियाला एकाबाबतीत पछाडलं आहे.
अफगाणिस्तानने या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचलाय. अफगाणिस्तान टीमचे स्पिनर गोलंदाजांनी एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ओव्हर टाकण्याचा विक्रम केला आहे. अफगाणिस्तानच्या स्पिनर गोलंदाजांनी याबाबतीत टीम इंडियाचा
विक्रम मोडीत काढला आहे. अफगाणिस्तानच्या स्पिनर्सने या वर्ल्ड कपमध्ये 268.5 ओव्हर टाकल्या. तर टीम इंडियाच्या स्पिनर्सनी 2011 वर्ल्ड कपमध्ये 251 ओव्हर टाकल्या होत्या. अफगाणिस्तानच्या स्पिनर्सनी टीम इंडियाच्या तुलनेत 17.5 ओव्हर जास्ता टाकल्या.
अफगाणिस्तान, 2023, 268.5 ओव्हर.
टीम इंडिया, 2011, 251 ओव्हर.
श्रीलंका, 2003, 233,1 ओव्हर.
अफगाणिस्तान, 20189, 223.2 ओव्हर.
अफगाणिस्तान क्रकेट टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.