Asia Cup 2023 साठी Afghanistan टीम जाहीर, 6 वर्षांनी ऑलराउंडरची एन्ट्री

| Updated on: Aug 27, 2023 | 5:58 PM

Afghanistan Squad For Asia Cup 2023 | अफगाणिस्तानने 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी क्रिकेट संघाची घोषणा केली आहे.

Asia Cup 2023 साठी Afghanistan टीम जाहीर, 6 वर्षांनी ऑलराउंडरची एन्ट्री
Follow us on

काबूल | आशिया कप 2023 स्पर्धेला 2 दिवसांनी 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या आशिया कप स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे 6 संघ एकमेकांचा आमसामना करणार आहेत. स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक हे काही आठवड्यांआधी जाहीर झालंय. त्यानुसार एकूण 13 सामने खेळवण्यात येणार आहेत. आशिया कपसाठी पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि त्यानंतर आता अफगाणिस्तान क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानने आशिया कपसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अफगाणिस्तान आणि आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. हशमतुल्ला शाहिदी हा अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तसेच टीममध्ये करीम जनात, नजीबुल्ला झद्रान आणि शराफुद्दीन अश्रफ या तिघांचं कमबॅक झालं आहे. विशेष बाब म्हणजे ऑलराउंडर करीम जनात याचं वनडे टीममध्ये तब्बल 6 वर्षांनी कमबॅक झालं आहे. करीमने अखेरचा वनडे सामना हा झिंबाब्वे विरुद्ध 24 फेब्रुवारी 2017 रोजी खेळला होता. विशेष म्हणजे करीमचा हा पहिलाच वनडे सामना होता.

हे सुद्धा वाचा

आशिया कपसाठी अफगाणिस्तान टीमची घोषणा

टीममधून दोघांना डच्चू

दरम्यान अफगाणिस्तानला पाकिस्तान विरुद्ध पार पडलेल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पराभूत व्हावं लागलं. पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 3-0 ने धुव्वा उडवला. त्यानंतर अफगाणिस्तानने टीममधून अझमतुल्ला उमरझाई आणि वफादर मोमंद या दोघांना डच्चू देण्यात आला आहे.

6 टीम 2 ग्रुप

आशिया कपसाठी एकूण 6 संघांना 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ ए ग्रुपमध्ये आहेत. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि आता अफगाणिस्तानने आशिया कपसाठी टीम जाहीर केली आहे. तर श्रीलंकेने अजूनही टीम घोषित केलेली नाही.

दरम्यान अफगाणिस्तान आशिया कपमधील आपला पहिला सामना हा रविवारी 3 सप्टेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. हा सामना लाहोर पाकिस्तान येथे आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरा सामना हा मंगळवारी 5 सप्टेंबरला श्रीलंका विरुद्ध होणार आहे.

आशिया कप 2023 साठी अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानुउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, रशीद खान, गुलबद्दीन नायब, करीम जनात, अब्दुल रहमान, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, नूर अहमद, सुलीमान साफी आणि फजलहाक फारुकी.